उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- १५ मार्च रोजी अकोला सर्किट हाऊस येथे दुपारी 2 वाजताच्या सुमारास समाज क्रांती आघाडी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज शेंडे प्रमुख मार्गदर्शना मध्ये अकोला जिल्हाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख उपस्थिती बंडुदादा वानखडे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, भारत वानखडे विदर्भ संघटक, सुदाम शेंडे अकोला जिल्हा संघटक, सावकार सुतार पहेलवान जिल्हा संरक्षक, जेष्ठ कार्यकर्ते अमर वासमिक सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे उपस्थित राहून विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
या वेळी नविन कार्यकर्त्यांना नियुक्ती देण्यात आली. त्या मध्ये प्रविण दारोकार अकोला जिल्हा युवा अध्यक्ष, सुनिल वानखडे अकोला शहर संघटक, सुरेश निकाडे बाळापूर ता. संघटक, सिद्धार्थ जंजाळ जिल्हा कार्यकारणी सदस्य, रमेश इंगळे जिल्हा कार्यकारिणी सदस्य, पवन वानखडे अकोला शहर कार्यकारिणी सदस्य अशा नियुक्त्या देण्यात आल्या
तसेच दि.२१ मार्च रोजी राज्य कार्यकारिणी विस्तार संदर्भात तसेच जिल्ह्यातील विधानसभा नियुक्ती संदर्भात बैठकीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीचे आयोजन व सुत्रसंचालन, प्रास्ताविक तसेच आभार भारत वानखडे यांनी मानले.
अनेक विषयाच्या संदर्भाने आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी बार्टीचे महासंचालक यांना दिले निर्देश पल्लवी…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जागतिक महिला दिनानिमित्त बोरगाव…
संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- दिनांक 8 मार्च 2025…
अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- भालेराव हायस्कूल सावनेर येथे…
गुणवंत कांबळे, मुंबई शहर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन भांडुप:- ट्रेनिंग इंस्टिट्यूट ऑफ स्कील्स…
उषाताई कांबळे सांगली जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कल्याण:- बुद्धगया महाबोधि महाविहार मुक्तीसाठी…