विट्ठल ठोंबरे, शिर्डी व राहता तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राहाता:- तालुक्यातील नांदूर खुर्द व बुद्रुक गावासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानुसार ऐतिहासिक असा निर्णय घेण्यात आला असून राहाता तालुक्यातील नांदूरमधील गावठाण, पाणीपुरवठा योजना, घरकुल योजना, घनकचरा, नवीन रास्ते, सांडपाणी व विविध योजना व प्रकल्प, व्यवस्थापन साठी शेती महामंडळ जमिनीचे वाटप करण्याचा महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला.
यामध्ये नांदूर खुर्द व बुद्रुक गावासाठी 11 एकर 29 गुंठे जमीन विनामूल्य प्रदान करण्याच्या आदेश देण्यात आला. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने नांदूर ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ नांदुर यांच्या पाठपुराव्याला यश आले. या निमित्ताने जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शालिनी विखे पाटील, खासदार सुजयदादा विखे पाटिल यांचे आभार मानण्यात आले. तसेच याकामी महसूल, जिल्हा परिषद, पंचायत समिती सर्वच अधिकार्यांचे आभार मानण्यात आले .
शेती महामंडळाची जमीन मिळवण्यासाठी 40 वर्षापासूनचा लढा नांदूर गावच्या सरपंच सौ.प्रीतम विशाल गोरे यांच्या माध्यमातून करत असताना आज मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. शेती महामंडळाची जमीन मिळवण्यासाठी 40 वर्षाचा लढा पुरुषोत्तम प्रल्हाद गोरे (माजी व्हाईस चेअरमन गणेश सहकारी साखर कारखाना) यांनी गणेश कारखान्यामार्फत नऊ ते दहा एकर जागेत अतिक्रमण करून बंधारे बांधले व त्याचा फायदा गावाला झाला. त्यानंतर सौ.प्रीतम विशाल गोरे यांनी गेली आठ वर्षापासून ग्रामपंचायतचा एक हाती सत्ता मिळून गावाचा विकास करण्याकामी मोठ योगदान दिले व गावाचा या विकासाला मोठे यश मिळाले. गावामधील विविध प्रकारच्या योजना व विकास कामाला गती मिळाली. नवीन ग्रामपंचायत कार्यालय, नवीन तलाठी कार्यालय, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, स्थानिक आमदार निधी तसेच इतर सर्व योजनांचा पुरेपूर उपयोग करून वाड्या वस्तीवरचे रस्ते कोट्यावधी रुपयांची कामे सध्या नांदूर गावात वेगाने चालू आहे तसेच जल जीवन मिशनची कामे व इतर सुख सुविधा यांना प्राधान्य देऊन गाव विकासाच्या दिशेने पुढे जात आहे. यामध्ये सर्वांचे सहकार्य लाभले त्याबद्दल नांदूर ग्रामस्थांकडून आभार व्यक्त करण्यात आले.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…