हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- शहरात एक भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. शहरातील गजबजलेल्या तुकुम परिसरात असलेल्या ए टू झे या बिग बाजाराला शुक्रवारी सकाळच्या सुमारास भीषण आग लागली. काही वेळातच या आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीने परिसरातील काही घरानांही आपल्या कवेत घेतले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली होती.
ए टू झे या बिग बाजाराला भीषण आग लागल्याची माहिती चंद्रपूर अग्निशमन विभाग मिळताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला. यावेळी घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. ही आग शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर शहरातील तुकुम परिसरात असलेल्या गृह उपयोगी स्वस्त वस्तु मिळणाऱ्या ए टू झेड या बिग बाजाराला भीषण आग लागल्याचे लक्षात आले. या परिसरात अनेक दुकाने तसेच हॉटेल असल्यामुळे नागरिकात भीती वाटत होती.
ए टू झेड या बिग बाजाराला आग लागल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखुन अग्निशमन विभागाला कळविले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ ते दहा गाड्या आग विझविण्याचा प्रयत्न केला अखेर अग्निशमन दलाच्या काही तासानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. या आगीत ए टू झेड या बिग बाजाराला लाखोंचे नुकसान झाले आहे.
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…