आशीष अंबादे, वर्धा जिला प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जिल्हातील समुद्रपूर येथे संपत्तीच्या वादातून बहिणीने केली भावाच्या घरी आत्महत्या केल्याचे समोर आल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.
संपत्तीचा मोह भल्याभल्यांना सुटत नाही. त्यात आता वडिलांच्या संपत्तीत लग्न झालेल्या मुलींना पण हिस्सा मिळण्याची झालेली तरतूद सासर माहेर यात दुरावा निर्माण करणारी ठरत असल्याची अनेक उदाहरणे पुढे येत आहे. समुद्रपूर येथील रमेश डगवार यांचे सहा महिन्यापूर्वी निधन झाले. त्यांच्या मागे चार मुलीला व एक मुलगा आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर बहीण भावात वाद सूरू झाले. गावातच डगवार परिवाराचे वडिलोपार्जित भव्य कॉम्प्लेक्स आहे. त्यावरू भाऊ राजू डगवार याचा चारही बहिणीसोबत वाद सूरू झाला होता. घटनेच्या दिवशी शुक्रवारी नागपूर येथील जोशीनगरात राहणाऱ्या ज्येष्ठ भगिनी वैशाली सुभाष कुरवाळे या घरून मॉर्निंग वॉक साठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडल्या. मात्र त्या थेट माहेरी समुद्रपूर येथे भावाच्या घरी पोहचल्या आणि वादाला सुरुवात झाली. यावेळी संतप्त झालेल्या वैशालीने घराच्या अंगणात असलेल्या विहिरीत उडी घेतली त्यात त्यांचा मृत्यू झाला.
वैशाली सुभाष कुरवाळे यांनी विहिरीत उडी घेतल्याची माहिती मिळताच नागरिकांनी एकच गर्दी केली होती. याची माहिती मृत महिलेचे पती सुभाष कुरवाळे यांना कळताच ते घटनासस्थळी दाखल झाले. मृतकचा पती आणि मुलाने वैशाली हिच्या मृत्यूस भाऊ राजू डगवार, त्याची पत्नी तसेच राजूचे सासरे जबाबदार असल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केली. त्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेची माहिती मिळताच समुद्रपुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष शेगावकर घटनास्थळी पोहचले. मृतदेह विहिरीतून काढून पुढील तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. रुग्णालयात नातेवाईकांचा संताप वाढू लागला होता. परिस्थिती चिघळू नये म्हणून विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित हे घटनास्थळी दाखल झाले. भाऊ व भावूजयीस अटक करण्यात आली.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत…
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…