समस्त पुलगावकर भीम आर्मी विदर्भ प्रमुख अंकुश कोचे यांचा सवाल.
प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुलगाव:- काही दिवसांमध्ये 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच रामनवमी या दोन मोठ्या सण तोंडावर असताना ठेकेदाराने त्याच मार्गावरील रोडाचे बांधकाम चालू करत आहे. पूलगाव मध्ये कित्येक वर्षापासून रेल्वे स्टेशन चौक ते नाचणगाव कुर्ला पर्यंत दुभाजनीय रोडचे बांधकाम चालू आहे परंतु ऐन सणासुदीच्या तोंडावर ठेकेदाराने या मार्गावरून रोडचे बांधकाम चालू करत आहे परंतु या मार्गावरून भव्य रॅली झाकी कार्यक्रम जुलूस निघतात त्याच मार्गावर आता ते खोदकाम चालू करणार आहे आणि एकीकडे दुकान त्यामध्ये फक्त पाच आणि सात मीटरचा रस्ता दुसऱ्या बाजूने टिन लावून खोदकाम करण्यात येणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच रामनवमी उत्सव निमित्त शहरात मोठ्या प्रमाणात जुलूस काढण्यात येत असते त्यामध्ये हजारो नागरिक हजार एका वेळी रस्तावर राहतात यामध्ये चेंगराचेंगरी ट्रालीचा अपघात खोदलेल्या रस्त्यामुळे जुलूस मधील झाकी यांची विटंबना किंवा गैर कृत्य प्रकार झाल्यास ठेकेदार तसेच सार्वजनिक बांधकाम जबाबदार राहणार. या रस्त्याची बांधकाम पुष्कळ मोठे आहे त्यांनी हा भाग काही कालावधीसाठी थांबून समोरील काम चालू करावे अभियंता यांचे सोबत बोलणं झाल्यावर त्यांच्या मते त्याच भागातील पाईपलाईन काम झाले आहे ठेकेदाराच्या लापरवाहीमुळे काम कासवगतीने करण्यात येत आहे तर याला दोषी पुलगाव चे नागरिक आणि रॅलीमध्ये सहभागी होणारे लोक आहे का ?
सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर करण्यात आल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्बंध नुसार मोर्चे आंदोलन धरणे करू शकत नाही परंतु पुलगाव तील नागरिकांची भावना समजून जिल्हाधिकारी यांनी यावर त्वरित दखल घेऊन मार्ग काढावा ही मागणी करण्यात आली आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…