पुणे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दिनांक ०६ मार्च २०२४ रोजी राज्यस्तरीय कारागृह महिला अधिकारी व कर्मचारी परिषदेचे उदघाटन ना. डॉ. नीलम गोऱ्हे उपसभापती, विधान परिषद, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या शुभहस्ते व श्री. अमिताभ गुप्ता, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला.
सदर परिषदेच्या दुसऱ्या दिवशी कारागृह महिला अधिकारी व कर्मचारी यांना कारागृहीन कामकाज करतांना येणाऱ्या अडी-अडवणी तसेच अचानक उद्भवणाऱ्या समस्या व त्यांचे निराकरण याबाबत स्वत:च्या अनुभवातून कारागृह उपमहानिरीक्षक श्रीमती स्वाती साठे तसेच ठाणे मध्यवर्ती कारागृह अधीक्षक श्रीमती राणी भोसले, नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह अधीक्षक श्रीमती अरुणा मुगुटराव व अमरावती मध्यवर्ती कारागृह अधीक्षक श्रीमती किर्ती चिंतामणी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
कारागृह उपमहानिरीक्षक श्रीमती स्वाती साठे यांनी त्यांचे भाषणात ज्या क्षेत्रात लांब लांब पर्यंत महिलांचा वावर नव्हता अशा खडतर वाटेतून मार्ग काढत त्यांनी त्यांच्या या वेगळ्या वाटेवरील प्रवासाबाबत सदर परिषदेत दिलखुलास संवाद साधला. कारागृहातील माणसांसाठी काम करत असतांना त्यांच्यात सकारात्मक बदल होवून सुधारणा व पुनर्वसन या कारागृहाच्या ब्रिदवाक्यानूसार नकारात्मक ऊर्जा सकारात्मकतेकडे वळवणे ही तुरुंग अधिकाऱ्यांची भूमिका असायला हवी. त्यामुळे कितीही आव्हाने आली तरी महिलांनी नेहमी सकारात्मक राहायला हवे, असे मत व्यक्त केले.
सदर परिषदेत महिला अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग व ही परिषद यशस्वीरित्या पार पडल्याने दरवर्षी परिषदेचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे महिला परिषदेचे औचित्य साधून एक महिला अधिकारी तुरुंगामध्ये कशी सुधारणा घडविते या संदर्भातील ‘दसवी’ हा हिंदी चित्रपट दाखविण्यात आला. तसेच दुपार सत्रात महिला अधिकारी व कर्मचारी यांना कर्तव्य बजावत असताना निर्माण होणाऱ्या ताण-तणावाचे व्यवस्थापन कशा प्रकारे करावे याबाबत श्रीमती मोनिका भोजकर यांनी विशेष मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नागपूर मध्यवर्ती कारागृहाच्या उपअधीक्षक श्रीमती दिपा आगे यांनी केले. सदर परिषद यशस्वीरित्या पार पाडण्याकरीता येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या उपअधीक्षक श्रीमती पल्लवी कदम, पोलीस निरीक्षक श्रीमती मंजिरी कुलकर्णी, तुरुंग अधिकारी श्रीमती सुषमा चव्हाण व श्रीमती सरिता पारधी यांनी विशेष प्रयत्न केले. सदर परिषदेकरीता महाराष्ट्र राज्यातून कारागृहातील सर्व गणवेषधारी महिला अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…