पुणे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- येथून 7 मार्चला एक खळबळजनक घटना समोर आली होती. येथील एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीचा स्वतःला पेटवून घेतल्याच्या घटनेने संपूर्ण पुणे शहर हादरले आहे. खाणावळीतील (मेस) मधील एका कामगाराने ‘आय लव्ह यू’ असा मॅसेज पाठवत त्रास दिल्या तसेच ‘रूममेट’ मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळून या तरुणीचे वसतिगृहात स्वतःला पेटवून घेतले होते. मंगळवारी (ता. 19 मार्च) रोजी सकाळी या तरुणीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. रेणुका बालाजी साळुंके वय 19 वर्ष मूळ रा. जेवळी, ता. लोहारा, जि. धाराशिव असे या विद्यार्थिनीचे नाव आहे.
यावेळी मृतक रेणुका बालाजी साळुंके हीचा वडिलांनी पुणे शहरातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात खाणावळीत काम करणाऱ्या सतीश जाधव आणि तिची रूममेट मुस्कान महेंद्रसिंग सिद्धू रा. भारती अभियांत्रिकी वसतिगृह, भारती विद्यापीठ, पुणे या संशयितां विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्यासह इतर कलमांन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
रेणुकाचे वडील बालाजी धोंडिबा साळुंके ४९, रा. जेवळी, ता. लोहारा) यांनी फिर्याद मध्ये सांगितले की, रेणुका ही भारती विद्यापीठात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होती. ती जात असलेल्या खाणावळीत काम करणाऱ्या सतीश जाधव नामक व्यक्तीने तिला मोबाइलवर ‘आय लव्ह यू’ असा संदेश पाठविला होता. त्यानंतर येता जाता तो तिला विचारणा करीत त्रास देत असे. या प्रकारामुळे रेणुका खूप घाबरली होती.
रेणुका ही खोलीत अभ्यास करीत असताना रूममेट मुस्कान सिद्धू हीसुद्धा वीज बंद करत असे. त्यामुळेही ती त्रासलेली होती. या प्रकारांना कंटाळून रेणुकाने 7 मार्चला वसतिगृहाच्या बाथरूममध्ये पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
तेव्हापासून रेणुकावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज तिचा मृत्यू झाला. दरम्यान, सतीश जाधव आणि मुस्कान सिद्धू यांनी त्रास दिल्यासंदर्भात तिने उपचारादम्यान पोलिसांना जबाब दिला होता. या घटनेचा पुढील तपास सहायक निरीक्षक वर्षा तावडे तपास करीत आहेत.
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…