महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष बबलू चव्हाण व राजुरा तालुका महिला संघटिका पुष्पा मेश्राम यांचे सामाजिक दातृत्व. छावा फाउंडेशन तर्फे सरदार वल्लभभाई पटेल वाचनालयात पुस्तकं भेट.
संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 19 मार्च:- नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष तथा छावा फाउंडेशनचे उपाध्यक्ष बबलू चव्हाण यांनी आपला वाढदिवस महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वसतिगृह येथील विद्यार्थ्यांना भोजनदान व पेंशिल किट वाटप करून, वल्लभभाई पटेल वाचनालयात पुस्तके भेट देऊन तर राजुरा तालुका महिला संघटिका पुष्पा मनोहर मेश्राम यांनी गोविद्यान अनुसंधान केंद्र, देवलापार जी. नागपूर द्वारा संचालित केंद्र नारायणदास मावाणी गो-शाळा व छात्रावास, चुनाळा येथील विद्यार्थ्यांना टॉवेल, पेन व अल्पोपहार देऊन साजरा केला.
यावेळी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष मोहनदास मेश्राम, शंकर बुऱ्हाण, श्रीरंग ढोबळे, अविनाश दोरखंडे, आसिफ सय्यद, मंदा सातपुते, सुनैना तांबेकर, रवी बुटले, वन्यजीव संवर्धन समितीचे कोरपना तालुका अध्यक्ष अजय गिरडकर, सुवर्णा बेले, दूर्वा बेले आदींची उपस्थिती होती तर सरदार वल्लभभाई पटेल वाचनालय येथे छावा फाउंडेशन तर्फे पुस्तके देण्यात आली.
यावेळी छावा फाउंडेशन चे अध्यक्ष तथा नेफडो चे नागपूर विभाग युवा अध्यक्ष आशिष करमरकर, सचिव आकाश वाटेकर, पराग दातारकर,कुणाल पिंपळशेंडे, भूषण रागीट, स्वप्नील म्यकलवार व ग्रंथालयातील विद्यार्थी उपस्थित होते. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या पदाधिकारी, संघटक, सदस्य यांचे वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक उपक्रम राबवून व पर्यावरण संवर्धन करणे, मानवता विकासाचे उपक्रम राबविने अश्या पद्धतीने केले जातात अशी माहिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले यांनी दिली. स्व खर्चाने एक सामाजिक बांधिलकी जोपासत ही संस्था संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात करीत असते.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…