प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट दि.२० मार्च:- हिंगणघाट शहरात मागील अनेक दिवसापासून फिदा हुसेन पेट्रोल पंप ते विठोबा चौक पर्यन्त मुख्य रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. पण या रस्त्या बांधकामाचा दर्जा पाहता तो किती दिवस टिकेल यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे शिवसेना ठाकरे पक्ष आक्रमक झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभागीय अधिकारी श्री धमाने यांना निवेदन देण्यात आले.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत हिंगणघाट शहरातील फीदा हुसेन पेट्रोल पंप ते विठोबा चौक पर्यन्त रस्त्याचे बांधकाम सुरू होते. अचानक या रस्त्याचे बांधकाम बंद झाले त्या संदर्भात शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेंद्र खुपसरे, तालुका प्रमुख सतीश धोबे, शहर प्रमुख सतीश ढोमने यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देण्यात आले.
मागील एक वर्षा पासून मंद गतीने या रस्त्याचे काम होत असताना अचानक काम बंद करून त्या रस्त्याचे ठेकेदारांनी सर्व साहित्य घेऊन गेले. या महत्त्वपूर्ण रस्ता अचानक बंद झाल्याने गावात उलट सुलट चर्चा सुरू आहे. हा शहरातील प्रमुख रस्ता असल्यामुळे त्या रस्त्यावर बस स्थानक, आठवडी बाजार, खाजगी ट्रॅव्हल्स स्टॅन्ड, महाविद्यालयात, शाळा, खाजगी दवाखाना इत्यादी असल्याने लोकांची रहदारी मोठया प्रमाणावर आहे. रस्त्याच्या अर्धवट कामामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही या रस्ता बनवत असतांना त्या रस्त्यावर टँकर ने कधी हि पाणी टाकण्यात आले नाही त्या मुळे रस्त्याच्या काही भागात मोठया प्रमाणावर भेगा पडलेल्या आहे. या ठिकाणी रस्त्याच्या शेवट मुरूम टाकण्यात आले त्या ठिकाणी मोठया प्रमाणावर खचके पडले आहे त्या मुळे कार, दोन चाकी वाहन चालवताना लोकांना अडचण येत आहे. काल आलेल्या अवकाळी पावसामुळे रस्त्याच्या मधल्या काही भागात पाणी साचलेले दिसून आले. या रस्त्यावरून तथाकथित नेते येणे जाणे करीत असताना त्यांच्या लक्षात येऊन सुध्दा ते गप्प का ? असा प्रश्न जनतेला पडला आहे.
स्थानिक लोक प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्याला हा रस्ता दिसत नाही का ? ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे जनतेला अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याच्या कामात कुठे तरी पाणी मुरत असल्याचे दिसून येत आहे. या रस्त्याचे उरवरीत काम लवकरात लवकर सुरू करावे अन्यथा शिवसेनेकडून चक्क जाम करण्यात येईल आणि पुढे होणाऱ्या परिस्तिथीला शासन, प्रशासन जवाबदार राहील असे निवेदन देतांना शिवसेनेकडून देण्यात आले.
यावेळी निवेदन देतांना मनीष देवडे, विठ्ठल गुळघाणे, नंदू रेडलावर, सुनील आष्टीकर, गजानन काटवले, शंकर मोहमारे, मनोज वरघणे, अनंता गलांडे, दिलीप चौधरी, गोपाल मेगरे, सूर्यकांत दुमने, नितीन वैद्य, दिलीप वैद्य, आशिष जैस्वाल, डॉ. जगताप इत्यादी उपस्थित होत.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…