प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. वडनेर गावाजवळ सिरसगाव रोडवर मानकापूर येथे भरधाव टिप्परने अनेक नागरिकांना चिरडलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या अपघातात 5 जणांचा मृत्यू तर अनेक जन गंभीर जखमी झाले आहे. वडनेर गावाजवळ मानकापूर येथे सायंकाळच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे.
रस्त्यावर उभ्या असलेल्या एका टिप्परला रस्त्याने जाणाऱ्या मोटर सायकल स्वाराने धडक दिली. त्यावेळी रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी अपघातात गंभीर जखमी नागरिकांची मदत करण्यासाठी आपली कार थांबवली त्याच वेळी त्यांना पण दुसऱ्या टिप्परने या मदत करण्याऱ्या नागरिकांना उडवलं त्यात वडनेर येथील एका तरुणाचा मृत्यू झाला. या अपघातामुळे घटनास्थळी संपुर्ण रस्त्यावर रक्ताचा सडा पडलेला आहे. काही मृतकाची तर ओळख आता पर्यंत पटली नव्हती. या डबल अपघाताने संपूर्ण वर्धा जिल्हा हादरून गेला आहे.
या अपघाताची माहिती वडनेर पोलीस स्टेशनला मिळताच वडनेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आपल्या ताप्यासह दाखल झाले. यावेळी रुग्णवाहिका मधून मृत्यदेह वडनेर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे. यावेळी शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती.
या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळून आली आहे. इतर गंभीर जखमी रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातात मृत्यू झालेल्याची ओळख अद्याप पटलेली नाही. संपुर्ण रस्त्यावर रक्ताचा सडा पडलेला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली. या परिसरात पोलिसांनी आता मोठा पोलीस बंदोबस्त लावला आहे.
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…