वयोवृद्धांनी स्वस्थ व निरोगी राहण्याचे सुत्र केले अंगीकृत
अनिल अडकिने नागपुर सावनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेरः-24 मार्च:- मातोश्री वु्ध्दाश्रम सोनपुर आदासा येथे दि.23 मार्च 2024 ते 25 मार्च 2024 या तीन दिवसीय योग प्राणायाम शिबीराला महिला पतंजली सावनेर व मातोश्री वु्ध्दाश्रम संचालक मंडळ यांच्या संयुक्त विद्देमानानी सुरुवात झाली असुन वरिष्ठ योग शिक्षक किशोर ढुंढेले व महिला योग शिक्षिका सुनीता ताई पाल यांनी आजच्या सत्राचे संचालन करुण वयोवृध्दांना योग प्राणायाम, हल्के व्यायाम व आहार आदी संदर्भात मार्गदर्शन केले.
यावेळी प्राणायाम या श्वसनाचा प्रक्रियेतील भस्त्रीका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी, उदगीथ्, प्रणवध्यान आदी सोबतच हात पायांचे सुक्ष्म व्यायाम, योगीक जाँगीग, सिंहासन, हास्यासन आदींच्या नियमित प्रयोगाने आपले शरीर कसे निरोगी ठेवता येईल यावर मार्गदर्शन करुण वयोवृद्ध अवस्थेत आपली दिनचर्या व आहार कसा असावा यावर पतंजली योगपीठ हरिद्वार येथे योगऋषी स्वामी रामदेवजी महाराज यांच्या व्दारे प्रशिक्षण प्राप्त वरिष्ठ योग शिक्षक किशोर ढुंढेले तसेच सुनीताताई पाल यांचे व्दारे खेळीमेळीच्या वातावरणात योग्य मार्गदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी मातोश्री वु्ध्दाश्रमातील सर्व वयोवृद्ध तसेच मातोश्री वु्ध्दाश्रमाचे व्यवस्थापक प्रदिपजी चंदनबटवे, व तेथील सेवाकरी यांनी उपस्थित राहून आयोजनाचा लाभ घेतला. यावेळी महिला पतंजली योग समिती तालुका सावनेर व मातोश्री वु्ध्दाश्रम सोनपुर यांच्या संयुक्त विद्देमानानी सुरु असलेल्या या तीन दिवस चालणाऱ्या या योग शिबिराच्या यशस्वीते करिता सावनेर तालुका महिला पतंजली प्रभारी लताताई ढवळे, सुनीता पाल, नागपुर जिल्हा महिला पतंजली प्रभारी उर्मीलाताई जुवारकर, राजु काळबांडे, शुभम ढवळे, विनोद काळे, मातोश्री वु्ध्दाश्रमाचे शरद चव्हाण, हरिश्चंद्र सावध इत्यादी परिश्रम घेत आहेत.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…