श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. भाजप नेत्या तथा लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवणल्याचा प्रकार साक्षाळ पिंपरी येथे शनिवारी सकाळी समोर आला आहे. याप्रकरणी बीड ग्रामीण ठाण्यात 5 आंदोलकां विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
बीड लोकसभेची उमेदवारी पंकजा मुंडे यांना जाहीर झाल्यानंतर त्या बीड जिल्ह्यात आलेल्या आहेत. नारायणगडावर शनिवारी सकाळी दर्शनासाठी गेल्या होत्या. त्या बीड कडे परत येत असताना त्यांना साक्षाळ पिंपरी येथील मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले. पोलिसांनी मराठा आंदोलकांना अडवले मात्र यावेळी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहून पंकजा मुंडेंचा ताफा बीडकडे निघून आला.
जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, आचारसंहितेच्या काळात विनापरवानगी आंदोलन केल्यामुळे बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात भरत बबन काशीद, शशिकांत परसराम काशीद, श्रीराम बंडू काशीद, अक्षय अजिनाथ काशीद, ज्ञानेश्वर हौसराव काशीद यांच्यासह अनोळखी ८ ते १० मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल केला. या सर्वांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी सांगितले आहे.
अहेरी: अहेरी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचा जनाधार झपाट्याने मजबूत होत आहे. नुकत्याच नारायणपूर येथे आयोजित…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं. 9420751809. अहेरी विधानसभा निवडणूकीचा प्रचारतोफा धडाडू लागल्या असून याअंतर्गत…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं. 9420751809. अहेरी विधानसभा निवडणूकीचा प्रचारतोफा धडाडू लागल्या असून याअंतर्गत…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं. 9420751809 अहेरी विधानसभा निवडणूकीचा प्रचारतोफा धडाडू लागल्या असून याअंतर्गत…