मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पोलीसांनी अवैध रेती उत्खनन करून रेती तस्करी करणाऱ्या विरुद्ध हिंगणघाट पोलीस स्टेशन येथील वृष्टी जैन (भापोसे) प्रभारी ठाणेदार यांचे आदेशाने पोलीस स्टेशन चे गुन्हे प्रगटीकरण पथकाने मोठी मोहीम छेडली आहे. या मोहिमे अंतर्गत हिंगणघाट नगर पालिकेच्या माजी नगरसेवकावर काल नांदगांव शिवारात धडक कारवाई केली. या माजी नगरसेवका विरुध्द हिंगणघाट पोलीसांत गुन्हाही दाखल करण्यात आला असून ते फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. भारतीय जनता पार्टी तर्फे वर्धा लोकसभा मतदारसंघात उमेदवार असलेले रामदास तडस हे आज हिंगणघाट येथे हिंगणघाट पोलीस स्टेशनच्या गुन्हात फरार असलेल्या निलेश ठोंबरे आरोपीच्या निवासस्थानी भेटायला गेल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चेला उधान आले आहे.
रेती माफिया व रामदास तडस यांची भेट: एकीकडे मोठ्या प्रमाणात अवैध रेती तस्करी करणाऱ्या फरार आरोपीची भारतीय जनता पक्षाचे उमेदवार यांची भेट घेतली त्यामुळे या रेती तस्करीला तर रामदास तडस याच्या वरदहस्त तर नाही ना! आज त्याच्या निवासस्थानी घेतलेल्या भेटीने संपूर्ण तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.
फरार आरोपी खा.तडस यांना भेटतो, परंतु पोलिसांना नाही: रेतीचे अवैध उत्खनन करून तस्करी करणाऱ्या माजी नगरसेवकावर हिंगणघाट पोलिसांनी कारवाई केली. त्यात तो पोलिसांना चकमा देत फरार आहे. असे खुद्द स्टेशन डायरी वरून पोलिसांनी सांगितले, परंतु दुसरीकडे भारतीय जनता पार्टी तर्फे वर्धा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी उभे असलेले रामदास तडस यांना फरार आरोपी घरीच भेटत असल्याच्या फोटो आज समाजमाध्यमावर प्रसारित होत असल्याने पोलिसाना फरार आरोपी मिळत नाही पण रामदास तडस यांना तो त्याच्यात निवासस्थानीच आज जातीने भेटून राजकिय चर्चा करतो, यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले.
वर्धा जिल्हातील हिंगणघाट तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू तस्करी जोमात सुरू आहे. त्यामुळे शासनाचा महसूल बुडत असल्याचे चित्र दिसून येत असताना हिंगणघाट पोलीस स्टेशन येथील वृष्टी जैन (भापोसे) प्रभारी ठाणेदार यांचे आदेशाने स्थानिक पोलीस विभागाने धडक कारवाई सुरू केली आहे. त्यात हिंगणघाट नगर पालिकाचा एक माजी नगरसेवक या रेती तस्करी करणारा ट्रॅक्टर पकडण्यात आल्याने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
मागील काही दिवसांपासून शासकीय अधिकारी आणि कर्मचारी लोकसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्यामुळे रेती उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यात राजकीय वरहस्त असल्यामुळे त्यांच्या कोण हाथ टाकणार असे आवाहन शासकीय अधिकाऱ्यांना पडत असतो. तरी शासकीय अधिकाऱ्यांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता हिंगणघाट नगर पालिकेच्या माजी नगरसेवकाचा रेती तस्करी करणारा ट्रॅक्टर वर धडक कारवाई केली.
पोलिसांनकडून प्राप्त माहितीनुसार, 30 मार्च ला नांदगाव बोरगाव शिवारात आरोपी दिपक शंकर मुधोळकर वय ३१ वर्ष, रा. पिंपळगाव (माथनकर) ता. हिंगणघाट जि. वर्धा २) निलेश ठोंबरे, रा. हिंगणघाट (पसार) यांचे ताब्यातील ट्रॅक्टर महिंद्रा कंपनीचा ५७५ डिआय विना क्रमांकाचा अंदाजे किंमत २,५०,०००/- रू व राज कंपनीची ट्रॉली विना क्रमांकाची किंमत अंदाजे ८०,०००/- रु मध्ये १०० फुट रेती किंमत ५,०००/- रू गौण खनिज (रेती) ची चोरटी वाहतुक करीत असताना मिळून आल्याने त्यांचे ताब्यातून वर नमुद एकूण ३३५०००/- रू चा माल हस्तगत करुन पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे कलम ३७९, ३४ भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंद करुन तपासात घेतला. पुढाल तपास पोलीस स्टेशन हिंगणघाट करीत आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…