मंगेश जगताप मुंबई शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- येथील डोंबिवलीतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे अशा. येथे मोबाईलच्या वादातून एका पती पत्नी मध्ये मोठे महाभारत घडलं आहे. आपली पत्नी सतत मोबाईलवर कोणाशी तरी बोलत असते या रागतून एका पतीने आपल्याच बायकोवर चाकूने हल्ला करत तिला जीवानिशी ठार करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात पीडित महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत फरार हल्लेखोर पतीचा शोध सुरू केला आहे. राजू शामुवेल हिवाळे वय 53 वर्ष असे हल्लेखोर पतीचे नाव तो विक्रोळीत एका खासगी कंपनीत नोकरी करतो. त्याला दारूचे व्यसन आहे. पत्नीवर हल्ला केल्यानंतर आरोपी राजू तेथून फरार झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोबिवली पूर्वेतील नांदिवली टेकडी येथील एका सोसायटीत हा खळबळजनक प्रकार घडला. या सोसायटीमध्ये आरोपी राजू हिवाळे आणि त्याची पत्नी सुरेखा हिवाळे वय 47 वर्ष हे दोघे राहतात. पत्नी सुरेखा मोबाईलवर अन्य कोणाशी तरी सतत बोलत असते याचा राग पती राजू याच्या मनात होता. या विषयावरून त्यांच्यात सतत वाद होत होते. रविवारी सुट्टी असल्याने तक्रारदार हिवाळे यांची मुलं बाहेर गेले होते. रात्री ते घरी आले. त्यांनी आई-वडिलांसाठी जेवण आले होते. मात्र त्याच्या आईने, सुरेखाने जेवणास नकार दिला.
याच मुद्यावरून राजू आणि सुरेखा यांच्यात भांडण सुरू झाले. यावेळी दोघांनी मद्य सेवन केले होते. दोघांचा मुलांनी पुढाकार घेऊन मिटविला. त्यानतंर सगळेजण झोपले. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास अचानक सुरेखा यांच्या किंचाळण्याचा जोरदार आवाज आला. ते ऐकून सगळेजण ताडकन उठले आणि बाहेर धाव घेतली. समोरचं दृश्य पाहून सगलेच हबकले. त्यांचे वजील, राजू यांनी सुरेखा हिच्यावर धारदार चाकूने वार करून तिला जीवानिशी मारण्याचा प्रयत्न केला. कुटुंबियांनी तिला लगेच खासगी रुग्णालयात दाखल केले. तिची परिस्थिती गंभीर असल्याने तिला सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्ल्यानंतर आरोपी राजू फरार झाले. या प्रकरणी मानपाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस फरार आरोपी राजू याचा शोध घेत आहेत.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…