आदित्य अन्नतंत्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण पुर्ण होताच नोकरीची संधी.

श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
बीड:-
आदित्य अन्नतंत्र महाविद्यालय बीड येथील अंतिम वर्षातील विद्यार्थ्याच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून आठव्या सत्रातील विद्यार्थी व विद्यार्थीनींना औद्योगीक प्रशिक्षणासाठी चार महिन्याच्या कालावधीकरिता बहुराष्ट्रीय आणि राष्ट्रीय अन्नप्रक्रिया कंपनीमध्ये प्रशिक्षणास पुणे, मुंबई, गुजरात, नाशिक, बांगलोर, दमण, बारामती, औरंगाबाद, इंदोर, नागपुर, इ. जिल्ह्यात तसेच परराज्यात महाविद्यालयाच्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून पाठविण्यात येनार आहे.

या ट्रेनिंग दरम्यान विद्ध्यार्थाना अन्नप्रक्रिया कंपनीच्या प्रोडक्शन, क्लॉलिटी कंट्रोल, रिसर्च आणि डेव्हलपमेंट, पॅकेजिंग, प्रमोशन आणि मार्केटिंग, रेगुलेटरी, इंजिनियरींग, वेस्ट मॅनेजमेंट, स्टोअरेज आणि ट्रॉन्स्पोर्टेशन, न्यु प्रोडक्ट डेव्हलपमेंट इ. विभागात प्रशिक्षण दिले जाणार आहे.

यावर्षी देखील या महाविद्यालयातील विद्यार्थी बालने गोपल, जीवादान इंडिया मुंबई , कुटे ज्ञानदेव, हळदीराम नागपुर , खामकर प्रमोद बारामती ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड, बारामती, गोराने ए. स. आयटिसी फूड डिव्हिजन लिमिटेड पुणे, नागरे आय.यन.टि फार्म्स प्रा.लि.‌ , ज्ञानेश्वर के. स्वीट्झ इंटरनॅशनल लिमिटेड दमन , कीर्तने राम पार्ले (खोपोली) ‌‌lllrd पार्टी पुणे , अंबुरे विशाल वंडरस बेरी फार्म्स प्रा.ली, चौधर प्रतिक सफ्रो फुड्स प्रा.ली. वीरकर अरविंद फार्मर्स होम प्रा.ली. पुणे, पवार सचिन मोंजिनिज प्रा.ली पुणे, आकाश खरबे ग्रीन इंन्व्हायरोसेफ इंजिनीअर्स अँड कन्सल्टंट प्रा. ली, मनिष मोरे ग्रीन इंन्व्हायरोसेफ इंजिनीअर्स अँड कन्सल्टंट प्रा.लि, प्रिती मकासरे ग्रीन इंन्व्हायरोसेफ इंजिनीअर्स अँड कन्सल्टंट प्रा.ली, सुबोध दर्फे व्ही. के.एल. फुड solution इंडिया प्रा.ली मुंबई, आशा राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय, फूड प्रासेसिंग इंडस्ट्रीजमध्ये औद्यागीक प्रशिक्षण पुर्ण होताच त्यांना नोकरीची संधी मिळली आहे.

आतापर्यंतच्या सर्व बॅचेसचे विद्यार्थी यशस्वीरीत्या शिक्षण पूर्ण करूण शासकीय तसेच निमशासकीय, खाजगी फूड इंडस्ट्रीज बहुराष्ट्रीय व राष्ट्रीय तसेच महाराष्ट्रात व इतर राज्यात आणि परदेशात उज्वल भविष्य घडवत आहेत. दरवर्षी कैंपस इंटरव्युवच्या माध्यमातून तसेच औद्योगिक प्रशिक्षण दरम्यान या महाविद्यालयातील विद्यार्थी उच्च पदावर स्थान भूषवतात आणि आपले या महाविद्यालयाचे तसेच बीड जिल्ह्याचे नाव लौकीक करुन यश संपादन करतात. या संस्थेचे संचालिका डॉ. आदिती सारडा मॅडम, प्रशासकीय अधिकारी डॉ. अरुण मुंडे सर, महाविद्यालयचे प्राचार्य श्याम भूतडा तसेच उप -प्राचार्य सोळंके सर व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट प्रमुख शेख मॅडम यांचे विशेष लक्ष असून विद्यार्थ्यांना हव्या असलेल्या सोईसुविधा आणि नवनविन तंत्रज्ञान याचा पाठपुरावा जातीने लक्ष देवून सातत्याने पुरवतात. दरवर्षी येथे प्रवेश घेण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यातील आणि इतर राज्यातील विद्यार्थी येतात आणि आपले भविष्य घडवतात. या वर्षाची प्रवेश प्रक्रियेची सुरुवात झालेली असून पालकांनी, विद्यार्थ्यांनी त्वरित संपर्क साधून आजच आपला प्रवेश निश्चित करावा.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

आता लाडका पत्रकाराचा नंबर लागेल का ! महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लक्ष देतील का ?

देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…

12 hours ago

नाशिक: पती पत्नीने गळफास लावून आत्महत्या, 10 वर्षीय चिमुकली मुलगी सुद्धा पलंगावर मृतावस्थेत.

मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…

12 hours ago

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री स्व. शरद काळे यांचा स्मृति दिन साजरा.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…

13 hours ago

कवठा येथील सरपंच प्रवीण जायदे यांच्यासह अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश.

खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…

13 hours ago

सिंदी तहसील कार्यालय वर विविध मागण्यासाठी कामगार नेते डाॅ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…

13 hours ago