चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- पोलीस दलातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. विवाहित महिलेवर बलात्कार करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला पाठीशी घालण्याचा खळबळजनक प्रकार चंद्रपूर येथे उघडकीस आला असुन जवळपास वर्षभरापासून विवाहितेचा लैंगिक छळ करणाऱ्या पोलीस मेजर व इतर दोन कर्मचाऱ्याविरुद्ध तक्रार देण्यास गेलेल्या महिलेची तक्रार घेण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
मागील एका वर्षापासून एका विवाहित महिलेवर लैंगिक छळ करणाऱ्या पोलीस मेजर व इतर दोन कर्मचाऱ्याविरुद्ध तक्रार देण्यास गेलेल्या महिलेची तक्रार घेण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. पण अखेर काही सामाजिक कार्यकर्ते आणि महिलांनी याबाबत जॉब विचारल्यानंतर अखेर आरोपी पोलिसानं विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर पोलीस विभागातील रामनगर पोलीस स्टेशन गुन्हे शाखेत कार्यारत असलेले पोलीस मेजर संजय अतकुलवार हा एका विवाहित महिलेचे मागील एका वर्षापासून जबरीने लैंगिक शोषण करीत होता, याकामी इतर दोन पोलिस कर्मचाऱ्याचा सहभाग होता असा आरोप पीडित विवाहित महिलेने केला आहे. अखेरीस तीनही पोलिसांचे लैंगिक शोषण असह्य झाल्याने विवाहिता रामनगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यास गेली असता सहकारी कर्मचाऱ्याला वाचविण्यासाठी त्या महिलेची तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ सुरू होती अखेरीस ही संतापजनक घटना कळताच काही सामाजिक संस्थांच्या महिलांनी पोलीस स्टेशन गाठुन गुन्हा नोंदविण्यास भाग पाडल्याने महिलेला तुर्तास तक्रार दाखल करण्यात यश आले असले तरीही सहकारी कर्मचाऱ्याविरुद्ध तपास योग्य पद्धतीने होईल का? व पीडितेला न्याय मिळेल का? असे प्रश्न निर्माण झाले आहे.
पिडीत महिलेला आरोपांनुसार सादर महिलेच्या पतीवर हत्येचा आरोप असुन पतीवर अधिकचे गुन्हे दाखल होऊ नये असे वाटत असल्यास व पतीची लवकर सुटका व्हावी असे वाटत असल्यास माझी इच्छा पुर्ण करावी लागेल अशी मागणी करून मेजर संजय अतकुलवार ह्याने पिडीत महिलेशी जबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. कालांतराने त्याच ठाण्यातील इतर दोन पोलिसांनीही त्या महिलेशी जबरीने संबंध ठेवल्याचाही महिलेचा आरोप असुन त्या महिलेकडे आरोपीच्या अश्लील व्हिडिओ कॉलचे स्क्रीन शॉट देखिल असुन महिलेने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना ते दाखविले असल्याचे कळले आहे.
ह्या पोलिसांची जबरी व शारीरिक शोषणाला कंटाळुन अखेरीस पिडीत महिला सायंकाळी 7 वाजता रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार गेली मात्र पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करून आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे पिडीतेचे म्हणणे असुन अखेरीस सरिता मालू व सरस्वती दास ह्या महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन गाठले व महिलेला आधार दिला.
अखेरीस जिल्हा पोलिस अधीक्षकांना घटनेची माहिती कळताच त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू तसेच उविपो अधीकारी यादव, ह्यांना दिलेल्या निर्देशानुसार दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रामनगर पोलीस ठाण्यात जाऊन महिलेची चौकशी केल्यानंतर आरोपी मेजर संजय अतकुलवार ह्याच्यावर भादंवि कलम 1860 चे कलम 450, 376 (2) (अ) (1), 376, 506 नुसार गुन्हा दाखल केला मात्र महिलेने आरोप इतर दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही हे विशेष.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…