इंडिया आघाडी शाखा -हिंगणघाट (शहर व ग्रामीण) यांचे वतीने आयोजन
अनिल कडू, विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- लोकसभा निवडणूक २०२४ मधील वर्धा लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गटाचे) अधिकृत उमेदवार अमर काळे यांच्या निवडणूक प्रचारार्थ आज हिंगणघाट येथील कलोडे भवन येथे हिंगणघाट तालुक्याचा (शहर व ग्रामीण) कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार गट) माजी आमदार राजुभाऊ तिमांडे व जेष्ठ नेते अँड सुधिरबाबु कोठारी यांच्या पुढाकाराने आयोजित या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात इंडिया आघाडीच्या सर्व घटकपक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी मंत्री व देवळी – पुलगाव मतदारसंघाचे आमदार रणजीत कांबळे, तर प्रमुख उपस्थिती जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत, काँग्रेसचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शिरीष गोडे, वर्धा जिल्हा शिवसेना (उबाठा) निरीक्षक कांचनताई ठाकुर, वर्धा जिल्हा निरीक्षक (रांका- शरदचंद्र पवार गट) राजुभाऊ वैद्य, आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष अनिल जवादे, कामगार नेते आफताब खान, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र खुपसरे, रांका (शरदचंद्र पवार गट) सरचिटणीस अतुल वांदिले, समुद्रपुर बाजार समितीचे सभापती हिम्मतराव चतुर, काँग्रेस पक्षाचे हिंगणघाट विधानसभा प्रभारी प्रविण उपासे, रांका तालुकाध्यक्ष विनोद वानखेडे, हिंगणघाट विधानसभा अध्यक्ष संजय तपासे, महेश झोटिंग, माजी नगराध्यक्ष सुरेश मुंजेवार, पंढरी कापसे, विठ्ठल गुळघाणे, सतिश धोबे, सतिशभाऊ ढोमणे, बाळुभाऊ महाजन, बाळुभाऊ अनासने, किशोर माथनकर, सौ. मोनाताई रिठे, यांची होती.
यावेळी सर्वच नेत्यांनी अमर काळे यांना प्रचंड मताधिक्यांनी निवडुन आणण्याचे आवाहन केले. यावेळी अमर काळे यांनी मागील दहा वर्षात माजी खासदार रामदासजी तडस यांनी एकही विकास कामे केले नसल्याचे तसेच शेतकरी, शेतमजूर, सर्व सामान्य जनतेला महागाई व बेरोजगारीने होरपळुन निघाल्याचे सांगितले तसेच देश हूकुमशाही व दडपशाही च्या मार्गाने जात असुन ही बेबंदशाही थोपविण्यासाठी इंडिया आघाडीच्या तुतारी या चिन्हासमोरील बटन दाबून उमेदवारांना प्रचंड मताधिक्यांनी निवडुन आणण्याचे आवाहन केले.
यावेळी प्रामुख्याने हरीभाऊ वडतकर, मधुकर डंभारे, उत्तम भोयर, राजुभाऊ मंगेकर, अशोक उपासे, मनिष देवढे ,शंकर मोहमारे, डॉ निर्मेश कोठारी, धनंजय बकाने, प्रकाश राऊत, विनोद झाडे, पांगुळ सर, नामदेव तळवेकर, किरण ठाकरे, सौरभ तिमांडे, गौरव तिमांडे, गोपाल पुरोहीत, मनोज वरघणे, बंटी वाघमारे, प्रशांत घवघवे, अमोल बोरकर, श्रीराम साखरकर, इस्माईल पठाण, गुरुदयालसिंग जुनी, अमित चाफले, तेजस तडस, विकी वाघमारे, विक्रांत भगत, दिगांबर नवघरे, बंडु काटवले, संतोष माथनकर, निताताई धोबे, निताताई गजबे, मिनाक्षीताई ढाकणे, व हजारो च्या संख्येने इंडिया आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…