प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- लोकसभा मतदारसंघ निवडणुक भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारी देण्यात आलेले विद्यमान खासदार रामदास तडस याच्या विरुद्ध त्याच्या सुनबाईने गंभीर आरोप करत संपूर्ण जिल्हात खळबळ माजवली आहे. त्यामुळे या निवडणुकीत सासरे विरुद्ध सुनबाईंची लढत रंगणार असून, या लढतीची संपूर्ण राज्यात चर्चा आहे. भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रामदास तडस यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, त्यांच्या विरोधात त्यांच्या सूनबाई पूजा तडस या अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. पूजा तडस यांनी आज (गुरुवार) रामदास तडस यांच्यावर आणि संपूर्ण तडस कुटुंबियांवर पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले आहेत.
भाजपा खासदार रामदास तडसवर सुनेचा गंभीर आरोप, लोखंडी रॉडने मारहाण करत अत्याचार, घरा बाहेर काढल.
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज नागपुरातील प्रेस क्लबमध्ये एक पत्रकार परिषद घेतली आणि याच पत्रकार परिषदेत पूजा तडस याही उपस्थित होत्या. याच पत्रकार परिषदेत बोलताना पूजा तडस यांनी संपूर्ण तडस कुटुंबियांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
पूजा तडस म्हणाल्या, ‘मला मुल झालं त्यावेळी तडस परिवाराकडून बोलण्यात आलं की, हे बाळ कोणाचं? या बाळाची डीएनए टेस्क करा, असं बोलण्यात आलं. मला लोकांना रॉडनंही मारण्यात आलं, नरेंद्र मोदी 20 तारखेला वर्ध्यात सभेसाठी येणार आहे. मी पंतप्रधान मोदींना एक विनंत करते की, माझ्या मुलाला न्याय द्या. मोदींनी सभेसाठी आल्यानंतर मला थोडा वेळ द्या आणि त्यांना मला न्याय द्यावा. लग्नानंतर मला एका फ्लॅटवर ठेवलं, मला उपभोगाची वस्तू म्हणून वापरण्यात आलं. त्याच्यातून बाळाचा जन्म झाला. खासदार आणि कुटुंबीय म्हणतात बाळाची डीएनए चाचणी करण्यास सांगितले जाते. खासदार म्हणतात, मी मुलाला बेदखल केलं, मुलाला घरातून काढलं नाही, मग मला एकटीलाच का काढलं घराबाहेर? माझ्याशी राजकारण करता.’
‘मी डीएनए चाचणीसाठी तयार आहे. मात्र, माझी विनंती आहे ती कोर्टाच्या माध्यमातून करा. मला दोन वेळचं अन्नही दिलं जात नाही. मोदीजी तुम्ही रामदास तडस यांची 20 तारखेला सभा घेण्यासाठी वर्ध्यात येणार आहात. तेव्हा मला दोन मिनिटांचा वेळ द्या. तडस कुटुंबीयांनी मला न्याय दिला नाही. म्हणून मी लोकांच्या न्यायालयात न्याय मागण्यासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, असेही पूजा तडस म्हणाल्या आहे.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं. 9420751809. अहेरी विधानसभा निवडणूकीचा प्रचारतोफा धडाडू लागल्या असून याअंतर्गत…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं. 9420751809. अहेरी विधानसभा निवडणूकीचा प्रचारतोफा धडाडू लागल्या असून याअंतर्गत…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं. 9420751809 अहेरी विधानसभा निवडणूकीचा प्रचारतोफा धडाडू लागल्या असून याअंतर्गत…
*विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काल दिनांक ०९/१०/२०२४ रोजी, अहेरी तालुक्यातील रामपूर,कन्नेपल्ली,खमनचेरु, या गावात कॉर्नर सभा घेण्यात…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा मतदार संघात प्रचाराचा जोर…