प्रा. अस्मिता भगत, आंबेडकरी लेखिका, रा. हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन विशेष लेख:- महात्मा फुले हे एका विचार युगाचे नाव आहे. भारतातील परंपरागत समाज संस्थांच्या विरुद्ध बंड करणारे पहिले पुरुष म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले होत. त्यांची विचारसरणी सत्याच्या आधारावर अधिष्ठित होती. महात्मा फुले यांनी शिक्षणाचे दारे मोकळे करून दिले. समाजातील अनिष्ट चालीरीती, रूढी, प्रथा, परंपरा विरुद्ध ज्योतिबा फुले व त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून कांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी जातिभेदाच्या व धर्म रूढीच्या बेड्या तोडून स्त्रियांवर लादलेल्या गुलामगिरीतून कायमची मुक्तता करण्यासाठी हाल अपेष्ठा सहन करीत अपमानांची पर्वा न करता सर्व जाती-धर्माच्या स्त्रियांच्या उद्धारासाठी संपूर्ण आयुष्य चंदनासारखी भिजवले व समस्त स्त्रियांना शिक्षण दिले.
हजारो वर्ष अडकून पडलेल्या स्त्रींची अवस्था दयनीय होती व आजही अनेक स्त्रियांची अवस्था दयनीय स्थितीची आहे, पुरुषी व्यवस्थेच्या शोषणाला झुंजारून देण्यासाठी स्त्रीवादी चळवळ उभी राहिलेली आहे. स्त्रीवाद म्हणजे तरी काय? या प्रश्नाचे उत्तर जेव्हा मिळते, तेव्हा उत्तर हेच येते की, स्त्रीला व्यक्ती सारखे जगू द्या,तिच्याकडे सन्मानाने बघा, तिलाही भावना, मन आहे, ती हाडमासांची व्यक्ती आहे. तिलाही कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक अधिकार आहेत. हे मान्य करणे म्हणजे स्त्रीवाद होय.
आजची भारतीय स्त्रीवादी चळवळ पाश्चात्य स्त्री वादामुळे प्रभावित झाली असली तरी तिचा उगम वास्तविक 19 व्या शतकात सुरू झालेल्या समाजसुधारकांच्या समाजसुधारणा चळवळीतून झालेली आहे. महात्मा फुले यांनी मुलींना शिक्षणाचे कार्य करून स्त्रीपुरुष समानता प्रस्थापित केली.1848 ला मुलींची पहिली शाळा काढली व या पद्धतीने शिक्षण समाजातील सर्व तळागाळातील समाजापर्यंत ते गेले पाहिजे यासाठी त्यांनी हंटर आयोगकडे मागणी केली. महात्मा ज्योतिबा फुले यांनी फक्त स्त्रियांच्या शिक्षणासाठी कार्य केले नाही तर स्त्रियांच्या पुनरुत्थानासाठी अमूल्य कार्य केलेले आहे.
तत्कालीन काळामध्ये ब्राह्मण समाजामध्ये विधवा महिलावर अनेक प्रकारचे अन्याय, अत्याचार व त्यांच्यावर जबरदस्तीने वैधव्य लादले जात, तसेच स्त्रियांना विद्रुप करण्याचा प्रयत्न केला जात असे केशवपणाची प्रथा तत्कालीन समाजामध्ये प्रचलित होती,स्त्रियांच्या सन्मानासाठी महात्मा फुले यांनी न्हाव्याचा संप करून केशव पण प्रथेविरुद्ध आवाज उठविला आणि महिलांना सन्मान मिळवून दिला. तत्कालीन समाजामध्ये बालविवाहाची आणि जठर विवाहाची प्रथा प्रचलित होती आणि पुनर्विवाहाला समाजामध्ये मान्यता नव्हती. पुण्यामध्ये ब्राह्मणाचे वर्चस्व असल्यामुळे ब्राह्मण समाजातील तरुण विधवांना हरिदास, किंवा कोणीतरी जवळच्या नातेवाईकाच्या वासनाला बळी पडावे लागत त्यामुळे त्या गरोदर राहत आणि समाजात होणाऱ्या बदनामीमुळे त्या जन्माला आलेल्या बाळाला फेकून देत अथवा गर्भपात करून घेत. अशा बिकट परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी महात्मा फुले यांनी 1863 ला बाल हत्या प्रतिबंधक गृह आपल्याच घरी स्वतःच्या खर्चाने सुरू केले आणि भारतातले पहिले बालहत्या प्रतिबंधगृह म्हणून ओळखले जाते.एवढेच नव्हे तर काशीबाई या ब्राह्मण विधवा स्त्रीच्या मुलाला यशवंत यास दत्तक घेऊन त्याला स्वतःचे नाव दिले व सन्मान दिला. अनाथ आश्रम, बालिकाश्रम चालविणे आणि सोबतच अस्पृश्यांसाठी स्वतःच्या मालकीचा पाण्याचा हौद खुला करणारे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले होत.
महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजातील जातीभेद व विषमतेला चातुॆवर्णव्यव्यवस्थेला विरोध करून समाजातील विषमता नष्ट करून तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचविण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन 24 सप्टेंबर १८७३ ला सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाजामध्ये स्त्री पुरुष दोघांनाही समान दर्जा दिला. स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाई यांना दिले त्यांच्यासोबत एकोणवीस स्त्रियांनी सत्यशोधक समाजाचे कार्य सुरू केले.
सार्वजनिक सत्यधर्म हा सत्यशोधक समाजाच्या प्रमाण ग्रंथाचे लेखन स्वतः करून आदर्श सत्यशोधक समाज आणि व्यक्ती कसा असावा हे सांगितले, या सत्यशोधक समाजातून अनेक सत्यशोधक कार्यकर्ते घडविले, ज्यामध्ये स्त्री पुरुष या दोघांचे समावेश असून सत्यशोधक समाजाचे कार्य अविरत चालण्यासाठी महात्मा फुलेंचे विचार समाजामध्ये पोहोचविणे गरजेचे आहे, त्यांचे कार्य समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत व समाजातील युवकापर्यंत पोहोचवणे आज काळाची गरज आहे.
क्रांतीसुर्य क्रांतीबा महात्मा फुले यांच्या जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन…🙏🙏
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…