पल्लवी मेश्राम, उपसंपादक (नागपुर)
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- उपराजधानी असलेल्या गृहमंत्र्याच्या शहरात महिला सुरक्षित नसल्याची एक घटना संतापजनक घटना उघडकीस आली. शहरात रस्त्याने पायी जाणाऱ्या एका महिलेचे भरदुपारी दोन युवकांनी तोंड दाबून उचलून झुडूपात नेऊन सामूहिक बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी या महिलेने मदतीसाठी जोरात आरडा ओरडा करीत एका आरोपीच्या हाताला चावा घेऊन तेथून पळ काढला. या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी दोनही आरोपींना अटक केली. कुबेरसिंग बागेशरण वय 30 वर्ष आणि सुनीलकुमार रुपशाह वय 30 वर्ष दोन्ही रा. उत्तरप्रदेश अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
नागपुर शहरात सोनेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत भरदुपारी एका महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला त्यामुळे पोलिसांच्या गस्त प्रणालीवर प्रश्न निर्माण झाला आहे. सोनेगाव परिसरात राहणाऱ्या 35 वर्षीय पीडित महिला विधवा आहे. तिला दोन मुले आणि भाऊ आहे. ती भावाच्या आधाराने राहते. धुणीभांडी करून मुलांचे पालन पोषण करते. बुधवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास ती धुणीभांडी करण्यासाठी पायवाटेने जात होती. नातेवाईकांशी फोनवर बोलण्यात व्यस्त असल्याचे पाहून मागून आलेल्या आरोपीपैकी एकाने महिलेचे तोंड दाबले तर दुसऱ्याने तिला उचलले. तिला आरडा ओरड करण्याची संधी सुध्दा मिळाली नाही. झुडूपात नेऊन तिच्यावर दोघांनीही सामूहिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेने एकाच्या हाताला चावा घेऊन तेथून पळ काढला. आरडा ओरड करीत जवळच्या एका अपार्टमेंटमध्ये गेली. सुरक्षारक्षकाला घडलेला सारा प्रकार सांगितला.
दरम्यान, लोकांची गर्दी झाली. भावालाही तिने माहिती दिली. सोनेगाव पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी गुन्हा नोंदवून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. दोन्ही आरोपी मुळचे उत्तर प्रदेशातील असून मागील सात वर्षांपासून नागपुरात मजुरीचे काम करतात. त्यांचे कुटुंब गावी आहे. सध्या सोनेगाव परिसरात तीन महिन्यांपासून मजुरी करतात. दोघांनाही गुरूवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सोनेगाव ठाण्यातील कर्मचारी गस्त घालण्यासाठी हलगर्जीपणा करीत असल्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…