पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीचे वातावरण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यात आदर्श आचार संहिता लागू असून अवघ्या काही दिवसात विदर्भात मतदान होणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस आणि निवडणूक अधिकारी यांच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे. त्यात नागपुर येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. नागपूरमध्ये पथकाने लाखोची रोखड जप्त केली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एसएसटी आणि नागपूर ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त पथकाने कारवाई केली. या पथकाने एकूण 10 लाख 35 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली. नागपूर चंद्रपूर महामार्गावर एका स्कॉर्पिओ गाडीतून ही रक्कम जप्त करण्यात आली. ही रक्कम कोणाची आणि कशासाठी वापरली जाणार होती, त्याचा शोध पोलीस घेत आहेत. संपूर्ण रक्कम कोषागारात जमा करण्यात आली आहे. या रकमेचा निवडणुकीशी काही संबंध आहे का? हे सुद्धा तपासल्या जात आहे
राज्यात येणाऱ्या वाहनांवर नजर: लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाचे पथक सज्ज झाले आहे. महाराष्ट्रामध्ये प्रवेश करणाऱ्या वाहनांवर या नियंत्रण पथकाचे लक्ष आहे. इतर राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या तसेच संशयास्पद वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यात असणाऱ्या महाराष्ट्र गुजरात सीमेवर तसेच केंद्रशासित प्रदेशाच्या सीमेवर तीन पथक तैनात करण्यात आले आहे.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाने गुजरात आणि इतर राज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या चार चाकी वाहन तसेच इतर प्रवासी वाहन यांची पोलीस आणि स्थिर नियंत्रण पथकाकडून कसून तपासणी केली जात आहे. निवडणूक काळात मतदारांना मतदानासाठी मद्य तसेच पैशाचे आमिष दाखवले जाते. याला आळा बसावा याकरिता निवडणूक आयोगामार्फत कठोर अशी पावले उचलण्यात आली आहेत. यासाठी सीमावर्ती भागांमध्ये स्थिर नियंत्रण पथक आणि पोलिसांमार्फत करडी नजर ठेवण्यात आली आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…