महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती सोहळा संपन्न.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन देसाईगंज:- दिनांक १४ एप्रिल २०२४ रोजी जल्लोषात साजरा करण्यात आला. महाराष्ट्रातील ख्यातनाम गायीका वंदनाताई खोब्रागडे अकोला व मानकर बाबू कव्वाल यवतमाळ यांच्या संगीतमय प्रबोधनामुळे प्रेक्षक कार्यक्रमात शेवट पर्यंत खिळून होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. निलेश खोब्रागडे व अध्यक्षा डॉ. रजनी भगत यांनी बाबासाहेबांच्या कर्तृत्वाला उजाळा दिला.
यावेळी डॉ. संजय भास्कर मेश्राम यांना 2024 ला आचार्य (पीएच.डी) पदवी मिळवल्या बद्दल सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉ. राहुल राऊत, जेसा मोटवानी, अभिमन्यू बनसोड कार्याध्यक्ष समता सैनिक दल ग्रामीण पूर्व विदर्भ, पुरूषोत्तम भैसारे ट्रेनिंग चीफ, तसेच शहरातील सर्व बुद्ध विहाराचे अध्यक्ष व सचिव उपस्थित होते. संध्याकाळी 6.00 वाजेनंतर विविध वार्डामधून रॅल्यांचे आगमन सुरू झाले आणि दीक्षाभूमी वर निळा सैलाब उफाळून आला.
यावेळी या कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात सकाळी 10.00 वाजता पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण समिती च्या अध्यक्षा कविता मेश्राम व सदस्या यशोदाबाई मेश्राम तर निळया ध्वजाचे ध्वजारोहण संजय नंदेश्वर व अरविंद भोवते सर यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर विहारात वंदना घेण्यात आली.
संध्याकाळच्या सत्राची सुरवात पाहुण्यांच्या हस्ते भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ममता जांभूळकर, संचालन जयश्री लांजेवार, तर आभार वंदना धोंगडे यांनी केले.जयंती निमित्त मसाला भाताचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन सम्यक जागृत बौद्ध महिला समिती ने सर्व उपासक, उपासिकांच्या सहकार्याने यशस्वी पार पाडले. विशेष सहकार्य नरेश वासनिक, मारुती जांभूळकर, शिरीष जांभूळकर, संस्थेचे सरीता बारसागडे यांनी केले यावेळी बौद्ध उपासक, उपासिका मोठया संख्येने उपस्थित होते.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…