अनिल अडकिने नागपूर सावनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर १७ एप्रिल:- नागपूर सावनेर मार्गावरील बोरुजवाडा ते आंगेवाडा येथे विभूती दास महाराजांनी स्थापन केलेल्या मेहर द्वार मेहेर आश्रम येथे १५ एप्रिल ते १६ एप्रिल असे दोन दिवसीय मेहर प्रेम सहवास वार्षिक सोहळा मेहेरद्वार मेहेर आश्रम आंगेवाडा येथे संपन्न झाला.
१५ एप्रिलला सायंकाळी ६ ते ९ वाजता दरम्यान मेहेर गीत, प्रभू प्रार्थना, पश्चाताप प्रार्थना व आरती तसेच पुकार वाटिका मेहर लवर्स ग्रुप नागपूर यांनी सादर केला. प्रियतम मेहरबाबा आंगेवाडा येथे १५ नोव्हेंबर १९४४ व २ जानेवारी १९५३ ला दोन वेळा आलेले आहेत आजही ते पवित्र पारिजातकाचे झाड हिरवेगच्च आहे.
१६ एप्रिलला प्रभात फेरी ८.३० वाजता बोरुजवाडा येथुन निघुन १० वाजता आंगेवाडा येथिल आश्रमात पोहचते त्यानंतर १० वाजता श्री चंद्रशेखर ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. ध्वनी प्रज्वलन युवा मेहर प्रेमी स्वयंसेवक आंगेवाडा यांनी केले. दीप प्रज्वलन डॉ.विजय निंबाळकर बोरुजवाडा यांच्या हस्ते झाले.
१०.३० वाजता स्वागत गीत झाले.११.१५ वा.ते ४.३० पर्यंत मेहेर गीत,वार्ताचा कार्यक्रम झाला.५.३० वा.प्रभूची प्रार्थना व आरती करण्यात आली.नंतर लगेच ६ वा.पासून महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली. हजारो नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ रिताताई भोयर व सौ भारतीताई भोंगाडे यांनी केले. संयोजक अवतार मेहेर बाबा आश्रम आंगेवाडा यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता रवी कोहळे, अतुल भोंगाडे, महेश टेकाडे,स्वप्निल कोहळे, सतीश गोतमारे, प्रवीण टेकाडे, जागेश्वर ढेपे, ऋषभ भोंगाडे, नितीन गोतमारे, पंकज भोंगाडे, मंगेश कांबे, शृतम भोंगाडे, प्रकाश कोहळे, छगन कोहळे, माजी सरपंच ज्ञानदेव चौधरी, अंशुल टेकाडे, कार्तिक कांबे गावकरी, संयोजक इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.
पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- नागपूर एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत…
रवींद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- जालना येथून एक संतापजनक…
*ऊच्चस्तरीय चौकशी करुन संबंधीतांवर कठोर कारवाहीची मागणी.* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.…
*ऊच्चस्तरीय चौकशी करुन संबंधीतांवर कठोर कारवाहीची मागणी.* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.…
उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- जिल्ह्यातील बाळापूर येथून एक…
रविंद्र भदर्गे जालना जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतूर:- तालुक्यातील बागेश्वरी साखर कारखान्यात…