युवराज मेश्राम विदर्भ ब्युरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन विदर्भ:- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी आज पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानात विदर्भातील नागपूर, गडचिरोली / चिमूर, चंद्रपूर, भंडारा, रामटेक नागपुर ग्रामीण या पाचही लोकसभा मतदारसंघात काही ठिकाणी मतदात्याची नावे मतदार यादीत नसल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला, त्यात मतदान प्रक्रिया संथ होत असल्याने गोंधळाची स्थिती वगळता शांततेत मतदान पार पडले.
विदर्भातील नागपूर, गडचिरोली / चिमूर, चंद्रपूर, भंडारा, रामटेक नागपुर ग्रामीण या पाचही लोकसभा मतदारसंघात सरासरी 54 ते 55 टक्क्यांपर्यंत मतदान झाले. प्रशासना तर्फे मतदानाचा टक्का वाढन्यासाठी केलेला प्रयत्न कडक ऊन आणि मतदारांच्या अनास्थेपुढे कुठेतरी कमी झालेल्या मतदानातून दिसून येत आहे. अर्थातच कमी मतदानाचा हा टक्का कुणाला फायदेशीर ठरणार हे 4 जून रोजी निकालातच उघड होणार आहे. नागपुरात तसेच दुर्गम गडचिरोलीत मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजतापासुनच मतदारांनी रांगा लावल्या, दिव्यांग व वरिष्ठ मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे यासाठी विशेष व्यवस्था होती.
गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम तसेच संवेदनशील अहेरी, आमगाव, आरमोरी, गडचिरोली या विधानसभा मतदारसंघामध्ये तसेच भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदार संघात सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदानाची वेळ निश्चित असल्याने मतदार राजाने झपाट्याने मतदानाचा हक्क बजावला.
सायंकाळी 5 वाजेपर्यंत भंडारा / गोंदिया लोकसभा मतदारसंघात 56.87 टक्के मतदान झाले आहे, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 56.11 टक्के मतदान झाले आहे, गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात 64.95 टक्के, नागपूर शहर लोकसभा मतदारसंघात 47.91 टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. तर रामटेक / नागपुर ग्रामीण लोकसभा मतदारसंघात: 52.38 टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…