उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- अकोला जिल्ह्यातील कळंबेश्वर गावातील सैनिक सुपुत्र किशोर गणेश अडागळे यांना शौर्यासाठी राष्ट्रपती पोलिस पदक मिळाल्याबद्दल त्यांचा दिनांक २१ एप्रिल रोजी कळंबेश्वर येथे सत्काराचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते उमेश सुरेशराव इंगळे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. या सत्कार सोहळ्यात वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी सदिच्छा भेट देऊन किशोर अडागळे यांचा शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष चिखली फुले शाहु आंबेडकर उत्सव समिती चे सचिव अभिमन्यू पवार हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी बालमुकुंद भिरड, महानगरपालिका अग्निशमन दलाचे विभाग प्रमुख मो. हारूण मनियार, दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थातच भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष डॉ. अरुण चक्रनारायण, समाज क्रांती आघाडीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बंडुदादा वानखडे, विदर्भ राज्य संघटक भारत वानखडे हे होते.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून प्रविण पातोडे, सामाजिक कार्यकर्ते ॲड रोशन तायडे, सामाजिक कार्यकर्ते गजानन हरणे, सामाजिक कार्यकर्ते सतिश तेलगोटे, समाज क्रांती आघाडीचे सुनिल वानखडे, अनिल सवई, अमर वासनिक, मिशन अभ्यासीकेचे संस्थापक अध्यक्ष शंकर कंकाळ, दैनिक अंजिक्य भारतचे पत्रकार श्रीकांत पाचकवडे, दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थातच भारतीय बौद्ध महासभेचे एम. एम. तायडे, रमेश जंजाळ, यशवंत इंगोले, वाहतूक पोलीस अंमलदार अरुण उपर्वट, संजय इंगळे, हिंगण्याचे माजी सरपचं पुरूषोत्तम अहीर, आदि सामाजिक तथा राजकीय पदाधिकारी व गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजय सिरसाठ, शुभम डोगंरे, इश्वर अडागळे, विक्कि जाधव, वैभव अडागळे, मंगेश सिरसाठ गौरव गवई, दुर्गेश आपटे, निशांत अडागळे, दर्शन इंगळे, रुपेश सरकटे, बंडुभाऊ वानखडे, अमोल गवई, विशाल अडागळे, विशाल गवई, सुरज गवई, संतोष खंडारे आदी गावातील नागरीकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली.
कीशोर अडागळे यांना शौर्य पदकासाठी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा अकोला,मिशन अभ्यासीका समाज क्रांती आघाडी महाराष्ट्र राज्यासह जिल्हातील विविध संघटना तसेच गावातील नागरिकांनी सत्कार केला.व सदर सत्कार समारंभाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते उमेश सुरेशराव इंगळे व गावकरी मंडळी कंळबेश्वर यांनी केले होते.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…