वन विभागाचे वनाधिकारी व कर्मचारी अलर्टमोडवर
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तेलंगाणा राज्यात दोन शेतकऱ्यांचा बळी घेऊन त्या रानटी हत्तीने प्राणहिता नदी ओलांडून पेद्दा वट्रा मार्गे अहेरी तालुक्यातील रेपणपली वन परिक्षेत्र जंगलात एन्ट्री झाल्याने सिरोंचा वन विभागाचे उपवंनरक्षक पूनम पाटे यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली कमलापूर चे वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश चौके व रेपणपली चे संजोग खरतड यांचे पथक रात्रंदिवस अलर्ट मोडवर आहेत.
सद्या राजाराम नियतक्षेत्रात रानटी हत्तीचे वावर असल्याने कुठल्याही प्रकारचे हानी किंवा नुकसान होऊ नये म्हणून गावा-गावात सजग व सतर्क करिता रात्रंदिवस वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी व वनमजुर यांनी दवंडी देणे, गाडी ने अलाऊन्स करून सतर्क करीत आहेत.
रानटी हत्ती रेपणपली वन परिक्षेत्र जंगलात येऊन पाच सहा दिवस झाल्याने सदर हत्तीने देवलमरी जंगल परिसरातून गुड्डीगुडम आणि आता राजाराम जंगल परिसरात आल्याने वनाधिकारी व वनकर्मचारी यांचे पथके जंगलात हत्ती शोध मोहीम राबवित आहेत. जंगलात शोधमोहिमेत हत्तीचे विष्टा व पायखुना आढळून येत आहेत.
राजाराम नियतक्षेत्रातील जंगलं डोंगर दऱ्याने व्यापलेला असल्याने हत्ती शोधाकरिता वनाधिकारी व कर्मचारी यांनी अत्याधुनिकयंत्रे जसे ड्रोन कॅमेरा चा वापर करीत असताना ही वन कर्मचाऱ्यांचे चांगलेच दमछाक होत असून तरी आपले कार्य मोठया जिकरीने करीत आहेत. वनाधिकारी पेट्रोलिंग करने, चोवीस तास जंगलात फिरताना दिसत आहेत मात्र सदर रानटी हत्तीने डोंगर दऱ्याचा आसरा घेत डोंगर पायथ्याशी आपलं तळ टोकाला आहे.
या शोधपथकात सिरोंचा उपवनसंरक्षक पूनम पाटे, कमलापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश चौके, रेपणपलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजोग खरतड, राजाराम क्षेत्र साह्ययक लक्ष्मण मडावी क्षेत्र सहायक गुड्डीगुडमचे इप्पाला तसेच वनरक्षक ओडगोपुलवार, सोयाम, नरोटे, पानेम, टेकाम, आतला, बन्सोड सह रेपणपली व कमलापुर वनपरिक्षेत्राचे सर्व वनरक्षक व वनमजुर या शोध मोहिमेत सहभागी झाले आहेत.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…