प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदार संघासाठी दि. 26 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे. मतदारसंघातील सर्व कामगार मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या दि. 5 एप्रिल 2024 शासन निर्णया नुसार मतदानासाठी कामगारांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
निवडणुकीच्या दिवशी कोणत्याही परिस्थीतीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना भर पगारी सुट्टी देण्यात यावी. अपवादात्मक परिस्थितीत कामगारांना भर पगारी सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. मात्र त्यासाठी कारखाने मालकाने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांची पूर्व परवागनी घेणे आवश्यक आहे.
सदर आदेश उद्योग, उर्जा, कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहील. उदा. खाजगी कंपन्या या मधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल्स, उपहारगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स ईत्यादींचा समावेश आहे.
उद्योग, उर्जा, कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादीच्या मालकांनी, व्यवस्थापनाने वरील सुचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदानासाठी सुट्टी किंवा पुर्व परवानगीने सवलत न दिल्यास आस्थापना धारकांविरुध्द कार्यवाही करण्यात येईल, असे सरकारी कामगार अधिकारी कौ. ज. भगत यांनी कळविले आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…