मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- आज दिनांक 26 एप्रिल रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी करत ही निवडणूक लढत आहे. त्यात हिंगणघाट तालुका हा वर्धा जिल्हातील सर्वात मोठे विधानसभा मतदारसंघ आहे. त्यात समुद्रपुर आणि सिंधी रेल्वे तालुका पण समाविष्ट आहे. मोठा तालुका असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी उन्हातान्हात घुमुन आपल्या उमेदवाराचा प्रचार केला. मात्र हिंगणघाट येथे नेता तुपाशी, कार्यकर्ता उपाशी, उन्हातान्हात राबणाऱ्या कार्यकर्त्याचा स्थानिक नेत्यानी केला हिरमोड.
उन्हातान्हात राबणाऱ्या, प्रसंगी कुटुंबापेक्षाही पक्षाला प्राधान्य देणारे कार्यकर्त्यांचे हजारो हात अहोरात्र कष्ट करतात. त्यामुळे कार्यकर्त्यांमुळेच पक्ष उभा राहतो, असे छातीठोकपणे सांगणाऱ्या बड्या नेत्यांना निवडणुकीपूर्वी कार्यकर्त्यांचा कळवळा येत असला तरी उमेदवारी जाहीर होताना कार्यकर्ता मागे सारला जातो. राजकीय वादळात प्रामाणिक कार्यकर्त्यांचे प्रयत्न सहजी दुर्लक्षित होतात आणि मोठा नेता अथवा पैसेवाला नेता मानाचा धनी ठरतो. पक्षाच्या धोरणांसाठी राबणारा कार्यकर्ता अखेरपर्यंत उपाशीच रहात असून सामान्यांपर्यंत पोहोचणाऱ्या, प्रत्यक्ष कामांमध्ये सक्रीय असून अनुभवी असलेल्या कार्यकर्त्यांच्या हाती मात्र काही येत नाही नाही, असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसच्या स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
ज्यांच्याकडे पैसा त्याच्याकडे सत्ता हे म्हटले जाते त्यामुळे, राज्यातील मोठे नेते अशाच पैसेवाला नेत्याचा घरी भेटी देतात आणि सामान्य कार्यकर्ता हा सतरंजा उचलण्याचे काम करत आहे होता आणि राहणार. या सामान्य कार्यकर्ताना वाटत आपली कामेही सहज होऊच शकतील, अशी एक आस्था त्यांचा मनात निर्माण होते. पण तो नेहमी राबून पण उपाशी राहतो आणि मधातील नेते त्याच्या साठी आलेले तूप खाऊन डकार पण घेत नाही अशी भावना हिंगणघाट तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी बोलून दाखविली आहे.
सामान्य कार्यक्त्यांना संधी मिळायला हवी, घराणेशाहीला नको. अनुभवी, ज्येष्ठ कार्यकर्ते असूनही त्यावेळी त्या उमेदवाराला तिकीट का दिले जात नाही? घराणेशाही अशा लोकांचा फक्त वापर करून घेतेय असेच दिसून येत आहे. सामान्य लोकांच्या अडचणी दूर करायला आता खरतर सध्या सामान्य व्यक्तीचीच गरज आहे, ज्याला अचूकपणे लोकांच्या समस्या गरजा समजतील. समस्यांचे चटके सोसलेल्या कार्यकर्त्यांलाच परिस्थितीची उत्तम जाण असते. त्यामुळे सामान्य कार्यकर्ता उपाशी राहण्यापेक्षा त्यांना पद मिळणे सर्वांच्याच हिताचे ठरते.
कार्यकर्ता हा आपल्यातील एक असतो, समाजातील चालू असलेल्या घटनांची त्याला जाण असते. पण घराणेशाहीमुळे अशा कार्यकर्त्याला मागे ठेवले जाते. कार्यकर्ता हा सर्वसामान्य भागातून येतो म्हणून त्यांच्या गाठीशी खूप सामान्य अनुभव असतात. त्या समस्या दूर करण्यासाठी तोच योग्य नेता होऊ शकतो. निव्वळ घराण्याचे नाव लागले म्हणून किंवा पैशाच्या जोरावर त्यांना समर्थन देऊन पुढे आणण्यापेक्षा शिक्षण व अनुभव या घटकांचीही चौकशी केली पहिजे. घराणेशाहीमुळे सामान्य कार्यकर्ता हा केवळ निवडणुका पर्यंत पक्षाचा असतो, निवडणुकांआधी पासून प्रत्येक कामासाठी ते निवडून आल्या नंतरच्या जल्लोषांपर्यंतचं कार्यकर्ता मर्यादित असतो. नंतरच्या काळात घराणेशाहीचाच उदोउदो होतो. त्यामुळेच केवळ नावावर न जाता शिक्षण, कार्यक्षमता, स्किल व काम करण्याची जिद्द या सगळ्या गोष्टीचा अंदाज घेऊन मगच योग्य मत दिल पाहिजे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…