राज शिर्के मुंबई शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- घाटकोपर येथील एका मुली बरोबर प्रेमात अस काही घडल की ती आज जगणं आणि मारण्याच्या यातना भोगत आहे. घाटकोपर येथील रहिवासी असलेल्या हर्षदा मिश्रा या तरुणीला पबजी गेया खेळाचं वेड होते. पब्जी गेमच्या माध्यमातून तिची एका तरुणा बरोबर मैत्री झाली. त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर मात्र, आता ही तरुणी जगण्या मरण्याचा संघर्ष करत आहे.
महाराष्ट्रातील घाटकोपर येथील हर्षदा मिश्रा ही 2022 मध्ये पब्जी खेळताना तिची मुरादाबाद येथील मोहम्मद फुजैल याच्याशी मैत्री झाली. मोहम्मद फुजैल हा मुरादाबाद येथील गलशहीद येथील रहिवासी आहे. पब्जी खेळताना ते दोन्ही एकमेकांच्या संपर्कात आले. त्यांच्यातील मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर हर्षदा ही फुजैल याला भेटायला मुंबईहून मुरादाबादला पळून आली. त्यानंतर 2022 मध्ये दोघांनी निकाह केला आणि ती हर्षदा पासून जीनत फातिमा बनली.
17 एप्रिल रोजी तिचा पती फुजैल याने हर्षदा हिच्या आईला फोन करुन सांगितले की, त्यांच्या मुलीने गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. हर्षदाला तत्काळ एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही फुजैल आणि त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे. हर्षदाची अवस्था आता गंभीर आहे. सध्या ती व्हेंटीलेटरवर असून जगण्या मरण्याचा संघर्ष करत आहे.
दरम्यान, हर्षदाची आई माधुरी मिश्रा यांनी सांगितले की, हर्षदा आधीपासूनच विवाहित होती. नंतर तिचा घटस्फोट झाला. यानंतर तिला पब्जी गेम खेळण्याचे व्यसन लागले. तसेच या माध्यमातून एक दिवस तिची मुरादाबाद येथील फुजैल याच्याशी मैत्री झाली. मग हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघे कॉलवर बोलू लागले. एक दिवस तिच्या आईने तिला नकार दिला. त्यामुळे ती तिच्या आजीच्या घरी चालली गेली. मात्र, काही दिवसांनी कळले की, आजीला कामानिमित्त बाहेर सांगून ती घर सोडून मुरादाबादला निघून आली. यानंतर आणखी काही दिवसांनी तिने फुजैल बरोबर लग्न केल्याचे समोर आले. यातच आता दोन दिवसांपूर्वी फोन आला की, तिने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. आता तिची प्रकृती गंभीर असून ती कोमामध्ये आहे.
डॉक्टरांनी सांगितले की, जीनत फातिमा (हर्षदा मिश्रा) हिला 16 तारखेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गळ्यावर तिने गळफास घेतल्याची खूण होती. तिची प्रकृती अत्यंत नाजूक होती. ती कोमामध्ये गेल्याची स्थिती होती, तिला तातडीने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. गळफास घेतल्याने तिच्या मेंदूपर्यंत ऑक्सिजन पोहोचत नाही आहे. त्यामुळे तिला श्वास घेण्यास त्रास होत आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…