मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील संत तुकडोजी वार्ड मधील कमला नेहरू प्राथमिक शाळा येथील मतदान केंद्र क्रमांक २६१/ अ या मतदान केंद्रावर एका महिलेच्या नावावर दुसऱ्या महिलेने मतदान केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. त्यामुळे निवडणुक विभागावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली आहे.
हिंगणघाट येथील कमला नेहरू प्राथमिक शाळा येथील मतदान केंद्र क्रमांक २६१/ अ या मतदान केंद्रावर मीना विजय पांगुळ यांचे नाव मतदान यादीत होते जेव्हा मीना विजय पांगुळ या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गेल्या त्यावेळी त्यांना कळले की त्यांच्या नांवे अन्य कोणी मतदान करून गेल्याने अखेर त्यांना टेंडर मतदान करावे लागले.
प्राप्त माहिती नुसार आज दुपारी सदर महिला मतदार मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर गेले असता अन्य कोणीतरी त्यांचे नावे मतदान करून गेल्याची बाब उघडकीस आली. त्यानंतर मतदान केंद्राअधिकारी यांनी नजरचुकीने मतदान झाल्याचे मान्य करून सदर मतदाराला टेंडर मत देण्याची अनुमती दिली व मतदान करण्यात आले. याप्रकाराने या केंद्रावर काही काळ गोंधळ उडाला होता.
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…