अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- २६ एप्रिलला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महिला पोलिस कर्मचार्यांनी आपल्या दोन लहान बाळासह कर्तव्य बजाविले. निवडणूक शांततेत व भयमुक्त वातावरण पार पडावी यासाठी पोलीस ड्युटी लागली होती. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती शिल्पा सोनाले यांच्या मार्गदर्शनात मोठ्या प्रमाणात मतदार केंद्रांवर पोलिसांना तैनात करण्यात आले होते.
यावेळी हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील केंद्रांवर पोलिस कर्मचारी लक्ष्मी सुनिल कश्यप या सुध्दा मुलगी सिध्दी जी पहिला वर्गात आहे, त्याच बरोबर मुलगा मौर्य जो तानुला बाळ जमतेम 1 वर्षाचा आहे त्यांना घेऊन या महिला पोलीस कर्मचाऱ्याने आपले कर्तव्य बजावले. यावेळी लक्ष्मी सुनिल कश्यप निवडणुकीच्या या महापर्वा वर दोन्ही मुलाना घेऊन दिवसभर भर उन्हाच्या तडाखात आपले कर्तव्य बजावले. लक्ष्मी कश्यप ह्या गेल्या १० वर्षा पासुन वर्धा पोलिस विभागात चालक या पदावर कार्यरत आहे. सध्या वर्धा येथे मोटर परिवहण विभागात पदासिन आहे.
निवडणुकीतील कर्तव्य हे जबादारी पुर्ण आणि जोखमिचे काम असते आणि ते निभावताना जोखीम ही असते. या कडे साहाय्यक निवडणुक अधिकारी शिल्पा सोनाले आणि तहसिलदार सतीश मासाळ यांची पारखी नजर पडली. तेव्हा तिच्या कर्तृत्वाचा सन्मान म्हणुन सहाय्यक निवडणूक निवडणूक अधिकारी श्रीमती शिल्पा सोनाले यांच्या मार्गदर्शनात तहसिलदार सतिश मासाळ यांनी पुष्पगुच्छ देत शुभेच्छा देऊन सत्कार करीत त्यांच्या कामाचे कौतुक केले. यावेळी तहसिलदार कपिल हाटकर प्रामुख्याने उपस्थित होते.
अनेक विषयाच्या संदर्भाने आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी बार्टीचे महासंचालक यांना दिले निर्देश पल्लवी…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जागतिक महिला दिनानिमित्त बोरगाव…
संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- दिनांक 8 मार्च 2025…
अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- भालेराव हायस्कूल सावनेर येथे…
गुणवंत कांबळे, मुंबई शहर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन भांडुप:- ट्रेनिंग इंस्टिट्यूट ऑफ स्कील्स…
उषाताई कांबळे सांगली जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कल्याण:- बुद्धगया महाबोधि महाविहार मुक्तीसाठी…