उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जुने शहर पाेलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या राजू बाबा चाैक परिसरातील शिवसेना वसाहत येथे राहणाऱ्या 29 वर्षीय तरुणाने खळबळजनक पाऊल उचलत आपल्या राहत्या घरात गळफास घेउन आत्महत्या केली. ही घटना 27 एप्रील राेजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी पाेलिसांनी आकस्मीक मृत्यूची नाेंद करीत तपास सुरु केला आहे.
अकोला येथील शिवसेना वसाहत येथील रहीवासी संदीप तुळशीराम यादगिरे वय 29 वर्ष असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो घरी एकटेच असतांना त्यांनी राहत्या घरात गळफास घेउन आत्महत्या केली. काही वेळाने परिसरातील नागरिकांना या प्रकाराची माहीती मीळताच त्यांनी पाेलिसांना याबाबत माहीती दिली. पाेलिसांनी घराचा दरवाजा ताेडून घरात प्रवेश करून संदिप यादगीरे यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वाेपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता येथील डाॅक्टरांनी मृत घाेषीत केले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदना साठी पाठविण्यात आला.
उत्तरिय तपासणीचा अहवाल आल्यानंतर तसेच पाेलिस तपासात या आत्महत्येचे कारण समाेर येणार असल्याची माहीती पाेलिसांनी दिली. या प्रकरणी जुने शहर पाेलिसांनी आकस्मीक मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…