मधूकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवर असलेल्या अबुझमाड जंगलात 10 नक्षल्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी ही कारवाई गडचिरोली पासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावरील नारायणपूरच्या कांकेर सीमावर्ती भागात महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला केली.
गडचिरोली जिल्ह्यापासून 20 किलोमिटर अंतरावर असलेल्या छत्तीगडमधील नारायणपूर पोलिस नक्षलविरोधी अभियान राबवित होते. यावेळी नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी देखील गोळीबार केला. यात 10 नक्षलवादी ठार झाले. बस्तरचे पोलिस महानिरीक्षक पी. सुंदरराज यांच्या माहिती नुसार, घटनास्थळाहून आठ नक्षल्यांचे मृतदेह सापडले आहेत. यात तीन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. घटनास्थळी एके 47 सह मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात हाय अलर्ट..
1 मे महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्याने गडचिरोली जिल्ह्यात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. सीमावर्ती भागांमध्ये नक्षलविरोधी अभियान गतिमान करण्यात आले असून यंत्रणा सजग झाली आहे.
नक्षलवाद्यांची अद्याप ओळख पटली नाही..
या घटनेतील मयत नक्षलवाद्यांची ओळख पटविण्यात अद्याप सुरक्षा यंत्रणेला यश आले नाही. यातील काही नक्षलवादी हे गडचिरोली जिल्ह्याशी संबंधित असल्याचा संशय आहे. अबुझमाड जंगलातील नक्षल कारवाईत या सर्वांचा सहभाग असू शकतो असा छत्तीसगड पोलिसांचा कयास आहे.
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…