अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- वाचन संस्कृती वृद्धींगत करण्यासाठी अव्याहतपणे प्रयत्नशील असणाऱ्या श्रेयस वाचनालय आणि संशोधन केंद्राला वर्धा येथील मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.प्रमोद नारायणे आणि हेमलता नारायणे यांनी 30 हजार रूपये किंमतीची एकशे पन्नास पुस्तके भेट दिली. यावेळी या पुस्तकां मध्ये कथा, कादंबरी, समिक्षा, वैचारिक साहित्य, आत्मचरित्र इत्यादींचा समावेश आहे.
प्रा. प्रमोद नारायणे आणि हेमलता नारायणे मागील तीन वर्षांपासून मारोतराव नारायणे स्मृती प्रतीष्ठानच्या माध्यमाने साहित्यिक आणि सामाजिक उपक्रम राबावित आहे. प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी राज्यस्तरीय वाड्ःमयीन पुरस्काराचे वितरण केले जाते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॕ. प्रमोद नारायणे स्वतः प्रतिभावंत लेखक आणि कवी आहेत. अलीकडेच त्यांच्या ‘मी कोरोना पाॕझिटिव्ह आलो’ या स्वानुभाव कथनाला विदर्भ साहित्य संघाचा पुरस्कार मिळाला आहे. ‘कवितेचे घर’ हा त्यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी राबविलेला अभिनव उपक्रम महाराष्ट्रभर गाजत आहे.
आधीच विविध साहित्य प्रकारातील ग्रंथांनी समृद्ध असलेल्या श्रेयस वाचनालय आणि संशोधन केंद्राला मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने तीस हजार रूपये किंमतीची एकशे पन्नास पुस्तके भेट मिळाल्या मुळे श्रेयस वाचनालय अधिकच समृद्ध होण्यास मदत होणार आहे. प्रतिष्ठानने दिलेल्या ग्रंथ भेटीबद्दल श्रेयसचे अध्यक्ष डाॕ.चंद्रकांत नगराळे, कार्याध्यक्षा सुजाता नगराळे, उपाध्यक्ष जयंत दाणी आणि श्रेयसचे सर्वच पदाधिकाऱ्यांनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. प्रमोद नारायणे, सचिव हेमलता नारायणे यांचे आभार मानले आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…