युवराज मेश्राम विदर्भ ब्युरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन विदर्भ:- विदर्भात 10 दहा लोकसभा मतदारसंघात लोकसभेची सार्वत्रिक निवडणूकीचे मतदान संपताच काँग्रेस हायकमांडने विदर्भातील युवक काँग्रेसच्या नेता पूत्रासह 49 पदाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याने राज्यातील युवक काँग्रेस मध्ये एकच खळबळ उडाली आहे.
विदर्भात 10 लोकसभा निवडणुकीत पक्षाचे आदेश आणि सूचना निर्देशांचे पालन न केल्याचा ठपका ठेवत अनेकांना कारणे दाखवा नोटीस तर काहींना निलंबित करण्यात आले. त्यात काँग्रेसचे नागपुर जिल्हाचे जिल्हाध्यक्ष मिथिलेश कन्हेरे गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष लॉरेन्स गेडाम यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.
अखिल भारतीय व प्रदेश युवक काँग्रेसने वेळोवेळी दिलेल्या सूचना निर्देशांचे पालन करण्यात आले नाही, संघटनात्मक जबाबदारी पार पाडली नाही असा ठपका या पदाधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला असून दिल्लीतून या सर्वांवर नजर ठेवली जात होती, अशी माहिती प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी दिली. पक्षातर्फे कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेल्यांमध्ये चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात तिकीटासाठी इच्छुक असलेल्या शिवानी वडेट्टीवार अभिषेक धवड, तनवीर विद्रोही या नेता पुत्रांचा समावेश आहे हे विशेष.निवडणूक निकालापूर्वीच या कारवाईने युवक काँग्रेस हादरली आहे.
एकप्रकारे भाजपशी वैचारिक लढाई लढताना बेशिस्त कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही हा मेसेज यानिमित्ताने लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असतानाच काँग्रेसने देण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थातच याचे चांगले की वाईट परिणाम होतात हे येणारा काळच सांगणार आहे. युवक काँग्रेसचे प्रदेश प्रभारी उदय भानू व सह प्रभारी कुमार रोहित यांनी ही तडकाफडकी निलंबन व कारणे दाखवा नोटीस बजावली असून विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी, माजी आमदार अशोक धवड यांचे पुत्र अभिषेक धवड, तनवीर विद्रोही, माजी नगरसेविका नेहा निकोसे या पदाधिकाऱ्यांचे काम समाधानकारक नसल्याचे म्हटले आहे.यात सरचिटणीस अनुराग भोयर, आकाश गुजर, अक्षय हेटे, पंकज सावरकर, दुर्गेश पांडे, सागर चव्हाण, केतन रेवतकर, सौरभ श्रीरामे, हारून खान, तौसीफ अहमद, फैजल नागानी, इर्शाद शेख, नवनाथ चौधरी, इमरान पल्ला, हेमंत कातुरे आदींचा समावेश आहे. या युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना संघटन मजबुतीसाठी पक्षातर्फे विविध उपक्रम देण्यात आले होते. पदाधिकाऱ्यांच्या कामावर हाय कमांडकडून देखरेख ठेवली जात होती. पक्षविरोधी कार्यवाही केल्याचा ठपका ठेवत या सर्वांना आता तीन दिवसात पक्षाने उत्तर मागितले आहे. उत्तर आल्यावर या सर्वांचे निलंबन होणार का, हा खरा प्रश्न आहे.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…