अनिल अडकिने नागपूर सावनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर १ मे:- सावनेर शहरात २९ तारखेला रात्री पासुन लाईन गेल्याने सर्व नागरिकांच्या झोपा उडाल्या पण मच्छारांना छान मेजवानीचा आनंद घेता आला. वीज वितरण कंपनीच्या मेंटेनन्सचा अभावामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
रविवारच्या रात्रीला ११.३० वा. पॉवर स्टेशन मधील 33 के.व्ही च्या ट्रांसफार्मर चे जम्पर बसल्याने लाईन स्टॅन्ड होऊ शकली नाहीत त्यामुळे वीज वितरण विभागाने ग्रामीण व शहराचा लोड एकच ट्रान्सफॉर्मवर दिला अनेक वर्षापासून पावर स्टेशन मध्ये अभावी जुन्याच वाहिन्या तारा असल्याने त्या कमकुवत झाल्या आहेत त्यामुळे ३० एप्रिल सोमवारला रात्री १०.३० च्या सुमारास ३३ के.व्ही.चे जंपर बसले त्याला दुरुस्त करण्यासाठी संपूर्ण सावनेर शहराची लाईन बंद करावी लागत असल्याने वरिष्ठांनी परवानगी दिली नाही त्यांनी फिडर १ व फीडर २ चा लोड एकत्रित करून रात्री १२ ला लाईन स्टैंड केले पहाटे ३ ते ३.३० वाजता जोराचे वादळ सुटल्याने खापा रोड तसेच सावनेर जुनी पंचायत समिती समोरील झाड तुटून वीज वाहिनीवर पडल्याने तारा तुटल्या यावेळी त्या क्षेत्रातील पुन्हा लाईन बंद करून इतरत्र च्या वीज पुरवठा मंगळवार ला सकाळी ६ वा सुरू केला तर काही भागांमध्ये सकाळी १०.३० वा. पुरवठा सुरळीत करण्यात आला. सर्व बाबींमुळे मच्छरांची चांगलीच मेजवानी झाली.
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…