कार्यकारी अभियंता विज वितरण कंपनी आलापल्ली मार्फत उपकार्यकारी अभियंता, विज वितरण कंपनी एटापल्ली.
विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- शहरातील विज वारंवार खंडित होत असल्यामुळे वीज वितरण कंपनीच्या विरोधात नागरिक आक्रमक झाले आहे. त्यामुळे कार्यकारी अभियंताला निवेदन देण्यात आले आहे.
एटापल्ली नगरपंचायत हद्दीतील विज वारंवार खंडित होत असते व कधी कधी तर रात्र- रात्रभर विज प्रवाह नसते त्यामुळे नागरिकांना नाहक अंधारात व पंख्याशिवाय रात्र काढावे लागते व ह्याचा परिणाम शरीरावर होऊन विविध समस्या निर्माण होत आहेत. अश्या आपत्कालीन वेळात येथील लाईनमॅन उपलब्ध नसतात व संबधीत अभियंता ‘नॉट रोचेबल असतो तेव्हा आशा अभियंता व लाईनमॅन सेवेयोग्य नसल्याने त्यांचेवर योग्य कार्यवाही करावी किंवा ग्राहक सेवेसंबंधी तंबी द्यावी.
एटापल्ली शहरातील लोकसंख्या ही 16,000 (सोळा हजार) इतकी असून 3000 (तीन हजार) घरे आहेत व एवढ्या लोकसंख्या व लोकवस्ती असलेल्या नगराला फक्त एकच लाईनमॅन नियुक्त आहे. तेव्हा एटापल्ली नगराकरिता जास्तीचे लाईनमॅनची नियुक्ती करावी व ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करावे. एटापल्ली- बोलेपल्ली असा फिडर जोडणी केलेला आहे तो जोडणी केलेल्या फिडरमुळे एटापल्ली फिडरवर ओझा वाढत असल्याने विज वहन क्षमता कमी होऊन उपकरणे गतीहीन होत आहेत. त्याकरिता बोलेपल्ली जोडलेला फिडर वेगळा करून उत्तम विज सेवा पुरविण्यात यावी. एटापल्ली प्रभाग क्रमांक 10 राजण्णा तालापल्लीवार यांचा घराजवळ अनेक वर्षांपासून खराब असलेले विद्युत डी.पी तात्काळ बदलवून द्यावे. एटापल्ली शहरातील तारांवर येत असलेल्या झाडांचे छटाई करावे.
लवकऱ्यात लवकर वरील बाबीवर उचित कार्यवाही करून व समस्या सोडविण्यात याव्या. अन्यथा नागरिक आक्रमक होईन मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल अशा इशारा यावेळी नागरिकांनी निवेदनातून दिला. यावेळी राहुल कुळमेथे, प्रभाकर दुर्गे, महेश पल्लुरवार, आतिश खापने, संदिप खेळवटकर, विजय नल्लावर, महेश कंकनालवार, अनुजकुमार बाला, कोमल विश्वास, जयश्री रामटेके, वैभव आत्राम, महानंद मंडल सह शेकडो नागरिक उपस्थित होते.
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…