राज शिर्के मुंबई शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे फटका गँगच्या विषारी इंजेक्शनमुळे मुंबई पोलीस दलातील हवालदाराचा विशाल पवार याचा बुधवारी 1 मे रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या वर गेल्या 3 दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते.
मृतक विशाल पवार पोलीस हवालदार मुंबई पोलिसांच्या वरळी लोकल आर्म्स डिव्हिजन-३ मध्ये कार्यरत होते. दरम्यान, 28 एप्रिल 2024 रोजी माटुंगा जवळील रेल्वे रुळांवर फटका गँगने विशाल पवार पोलीस हवालदाराला विषारी इंजेक्शन टोचल्याने त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप केला जात आहे.
दादर गव्हर्नमेंट रेल्वे पोलिसांच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक विशाल पवार हे सोमवारी 28 एप्रिल रोजी मुंबई लोकलने ड्युटीसाठी जात होते. माटुंगा आणि सायन स्थानकांदरम्यान विशाल हे फोनवर बोलत असताना फटका गँगच्या एका सदस्याने त्यांच्या हातावर फटका मारला. यामुळे त्यांच्या हातातील फोन निसटून खाली पडला. यानंतर हा फोन घेऊन फटका गँगने पळ काढला. लोकलचा वेग कमी असल्याने विशाल यांनी खाली उतरून फटका गँगचा पाठलाग केला. काही अंतरावर गेल्यानंतर फटका गँगने विशाल यांना घेरले आणि धक्काबुक्की केली. विशाल यांनी प्रतिकार केला असता फटका गँगने त्यांच्या पाठीत विषारी इंजेक्शन टोचले. तसेच त्यांच्या तोंडात लाल रंगाचे द्रव ओतले. सोमवारी 9.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
यानंतर विशाल जमीनीवर कोसळले. दुसऱ्या दिवशी शुद्दीवर आल्यानंतर विशाल घरी परतले. मात्र, त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्या कुटुंबाने त्यांना सोमवारी ठाण्यातील रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान पवार यांची प्रकृती खालावली आणि बुधवारी त्यांचा मृत्यू झाला, असे मध्य रेल्वेचे पोलिस उपायुक्त मनोज पाटील यांनी सांगितले.
आरोपींचा शोध सुरू: स्थानिक कोपरी पोलीस स्टेशनने त्यांचे जबाब नोंदवून भारतीय दंड संहितेच्या कलम ३९२ (दरोडा), ३९४ (लुटताना दुखापत करणे), ३२८ (विषारी द्रव्य प्राशन करून इजा करणे) अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपासासाठी हे प्रकरण कोपरी पोलीस ठाण्यातून दादर जीआरपीकडे वर्ग करण्यात आले. गुन्हेगारांना पकडण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आली आहेत, असे पाटील यांनी सांगितले.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…