जिल्हाविनापरवाना सुरू असलेल्या अनाधिकृत शाळांची तपासणी करून जिल्ह्यातील अनाधिकृत शाळांची यादी जाहीर करणार : शिक्षणाधकाऱ्यांचे मनोज जाधव यांना लेखी आश्वासन
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
बीड:- राज्यामध्ये ६७४ शाळा अनाधिकृत आढळून आल्या नंतर शिक्षण आयुक्त आणि शिक्षण संचालक, पुणे आणि उसंचालकांनी यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांची तपासणी व विनापरवानगी सुरू असलेल्या अनाधिकृत शाळांवर कार्यावाही करून अनाधिकृत शाळांची यादी जाहीर करण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या होत्या मात्र जिल्ह्यातील शाळांची तपासणी फक्त कागदोपत्री स्वरूपात झाली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक आणि शिक्षण उपसंचालक यांच्या शाळा तपासणीच्या आदेशा नंतरही बीड मध्ये अनाधिकृत पने अनेक शाळा सुरू आहेत त्यांची शिक्षण विभागाने पुन्हा तपासणी करावी अशी मागणी शिवसंग्रामचे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी दि. १२ सप्टेंबर रोजी दिलेल्या आपल्या निवेदनात केली होती त्याच बरोबर जर अनाधिकृत शाळांची पुन्हा तपासणी न झाल्यास दी. १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी शिक्षण विभागासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिक्षण अधिकारी यांनी लवकरच शाळा तपासण्या केल्या जातील असे लेखी आश्वासन मनोज जाधव यांना कला दिले.
बीड जिल्ह्यामध्ये शाळांची संख्या मोठ्या प्रमाणत आहे. कटाक्षाने शाळा तपासण्या झाल्यास या मध्ये मोठ्या प्रमाणात अनाधिकृत शाळा अढळून येण्याच्या दाट शक्यता आहे. बीड मध्ये अनाधिकृत शाळा अढळून आल्या तर अश्या शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. यामुळे विद्यार्थी आणि पालकांना नाहक मानसिक त्रासाला सामोर्य जावा लागणार आहे. तेव्हा पुन्हा अशी वेळ इतर पालकांवर येऊ नये यासाठी आणि शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता यावी यासाठी बीड जिल्ह्यातील सर्व शाळांची तपासणी करून अनाधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात यावी तसेच जिल्ह्यातील बऱ्याचश्या शाळा या शिक्षण हक्क कायद्याचे भंग करत आहेत तेव्हा शाळांना ज्या जागेवर शाळा सुरू करण्याची परवानगी शासनाने दिली आहे त्या शाळा त्याच ठिकाणीच भरतात का? शाळा मध्ये पालक समिती आहेत का त्यांच्या बैठका होतात का? एका शाळेची परवानगी घेवून त्या परवानगी वर शाळा आपल्या इतर शाखा दुसऱ्या ठिकाणे चालवता याला शासनाची परवानगी आहे का? एका युडायस कोड वर अनेक शाळा चालवता येतात का?, शाळा मध्ये मुलांना शिकवणारा शिक्षकांचा गुणवत्ता आणि त्यांची शैक्षणिक पात्रता अश्या अनेक गोष्टीचा देखील शाळा तपासणीत समावेश करावा. अशी मागणी मनोज जाधव यांनी मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, मा.विभागीय आयुक्त,शिक्षण संचालक (प्राथमिक),शिक्षण संचालक (माध्यमिक),शिक्षण उपसंचालक , जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी
आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, बीड यांच्या कडे केली होती यांची दाखल घेत शिक्षणाधिकारी यांनी पुन्हा शाळा तपासण्या केल्या जातील असे लेखी आश्वासन दिले आहे. त्यामुळे आपण १७ सप्टेंबर रोजीचे आंदोलन मागे घेत असल्याचे मनोज जाधव यांनी सांगितले आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…