पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. दिल्ली येथील एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीकडून वेश्याव्यवसाय केला जात असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या विद्यार्थिनीला वेश्याव्यवसाय करण्यासाठी दिल्लीतून विमानाने नागपुरात आणले होते.
बेलतरोडी पोलिसांनी मनीष नगर येथील हॉटेल अशोका इम्पेरियलमध्ये धाड टाकून वेश्या व्यवसायाचा भांडाफोड केला. यावेळी आरोपी दिल्लीतील एका 24 वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थिनीकडून देहविक्री करून घेत होते. जवळपास आठवडाभरापूर्वी तिला विमानाने नागपुरात आणण्यात आले होते. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी हॉटेलमध्ये धाड टाकली. आणि वेश्याव्यवसाय करणारी तरुणी मिळून आली. बंटी ऊर्फ बिलाल अहमद अली वय 40 असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी बंटी ऊर्फ बिलाल अहमद अली याची देश-विदेशात सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलालांशी ओळख आहे. याचा फायदा घेत तो नागपुर येथे हायफोफाईल लोकांना तरुणी पुरवत होता. यावेळी तो देहव्यापार करण्यासाठी देश-विदेशातील तरुणींना नागपुरात आणत असतो आणि ग्राहकांना पुरवितो.
मागील काही दिवसांपासून त्याने दिल्लीतील एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीला विमानाने नागपुरात बोलावून घेतले. तिला पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले. गेल्या आठ दिवसांत चांगली कमाई केल्यानंतर तिला हॉटेल अशोकामध्ये पाठविण्यात आले होते. पोलिसांना याची माहिती मिळताच सापळा रचून कारवाई करण्यात आली. पुढील कारवाई पोलीस करत आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…