महाराष्ट्र संदेश न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी मधुकर गोंगले यांनी अतिदुर्गम भागात जाऊन जनतेची समस्या जाणून घेतली.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- महाराष्ट्रातील शेवटच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्यातील अनेक गावे विकासापासून आज पण वंचित आहेत, मात्र शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याकडे दुर्लबपणे दुर्लक्ष करीत असतात. आणि हे गावे विकासापासून वंचित ठेवले गेले आहे.
एकीकडे भारताचे पंतप्रधान मोदी म्हणतात विकासाची गंगा आम्ही गावागावात नेली आहे. पण दुसरीकडे मूलभूत गरजा पासून वंचित आजही गडचिरोली जिल्हा मागासलेला असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे, या जिल्ह्यात बहुतांश अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहून नागरिकाच्या समस्या सोडवत नाही. शासनाच्या सध्या योजना इतपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे विकासकामाना खीळ बसली आहे.
स्वातंत्र होऊन 75 वर्ष झाले परंतु अच्छे दिन या भागात पाहायला मिळत नाही आहे.अच्छे दिनचे तेरा वाजले सारखे दिसतात. अगोदरच नक्षलवाद्यांच्या भीतीच्या सावटाखाली जगत असलेल्या जनतेला स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही. घरकुल योजना पासून अनेक नागरिक वंचित आहे. दळण वळण साठी साध्ये रस्त्ये नाही. इथे फक्त विकासाच्या नावावर नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली जात आहे.
अहेरी तालुक्यातील राजाराम खांदला पासून अवघ्या 10 किलोमिटर अंतरावर असलेल्या कोरेपल्ली, कवटाराम, कपवंचा हा गाव अतिसंवेदनशील गाव असून या गावात अनुसूचित जमाती राहत असून 100 टक्के आदिवासी बहुल गाव आहे. मात्र शासन व प्रशासन दुर्लक्ष करीत असतात. अंदाजे राजाराम ते परमिलि 20 किलोमिटर अंतर असून अंदाजे सन 1994 1995 या वर्षी बीआरओ मार्फत काम सुरु करण्यात आले होते. परंतु काही कारणास्तव काम बंद करून व लहान, मोठे पुलियाचे बांधकाम करण्यात आले आहे,. मात्र आता हे रस्त्याअभावी लहान, मोठे पुलिया धूळखात आहेत. या गंभीर समस्याकडे लक्ष वेधून समस्या सोडवाव्या अशा त्या भागातील नागरिकांकडून अपेक्षा आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…