हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. बल्लारशाह वनपरिक्षेत्रात दोन वाघाच्या झुंजीत एक अडीच वर्षीय नर वाघाचा मृत्यु झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील कारवा बल्हारशाह जंगल सफारी मध्ये १३ मे रोजी बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील वनकर्मचारी गस्त करीत असतांना सकाळी ९.३० वाजताचे सुमारास सफारी मधील कक्ष क्रं.५१० नियतक्षेत्र किन्ही येथे दोन वाघाच्या झुंजीत एक अडीच वर्षीय नर वाघाचा मृत्यु झाल्याचे दिसुन आले.
सदर कार्यवाही करण्याकरीता मौका स्थळी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांचे प्रतिनिधी मुकेश भांदककर व राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण प्रतिनिधी बंडु धोत्रे यांना बोलावुन यांचे समक्ष मौका पंचनामा नोंदवुन वन्यप्राणी (संरक्षण) अधिनियम १९७२ अन्वये प्राथमीक वनगुन्हा क्रमांक ०८९६१/२२४०१३ दिनांक १३ मे २०२४ जारी करुन मृत वाघाचे शव ताब्यात घेण्यात आले व शव शवविच्छेदना करीता वन्यजीव उपचार केन्द्र, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपुर येथे नेण्यात आले.मृत बछड्याचे शवाचे शवविच्छेदन डॉ. कुंदन पोडचलवार, पशुवैद्यकीय अधिकारी, TTC चंद्रपुर व डॉ. आनंद नेवारे, पशुवैद्यकीय अधिकारी, चंद्रपुर यांनी केले.
पुढील तपासा करीता मृत वाघाचे सिलबंद नमुने घेण्यात आले असुन ते रासायनीक विश्लेषणा करीता वैज्ञानिक प्रयोगशाळा येथे पाठविण्यात येणार आहे. सदर तपास मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर चे उपवनसंरक्षक, श्रीमती. स्वेता बोड्डु व सहाय्यक वनसंरक्षक आदेशकुमार शेंडगे यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह नरेश रामचंद्र भोवरे हे करीत आहेत.
* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत…
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…