पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- मध्ये मोठ्या प्रमाणात गांजाची विक्री होत असताना नागपुर पोलिस आयुक्त डॉ.रवींद्रकुमार सिंगल यांनी गांजा तस्करीत सहभागी असलेल्या एका पोलीस हवालदारावर धडक कारवाई केल्याने पोलीस विभागात एकच खळबळ माजली आहे.
नागपुर पोलिस आयुक्त डॉ.रवींद्रकुमार सिंगल हे गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी गांजा तस्करीत सहभागी असलेल्या एका हवालदाराला बडतर्फ केले आहे तर सहकारी महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करणाऱ्या दोन पोलिसांना निलंबित केले आहे. यापुढे अवैध कामांत सहभागी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर लगेच कठोर कारवाई करण्याचा इशारा यातून देण्यात आला आहे.
रोशन उगले असे गांजा तस्करीत सहभागी असलेल्या हवालदाराचे नाव आहे. तर युवराज राठोड व आदित्य यादव यांना निलंबित करण्यात आले आहे. रोशन उगले याला 2021 मध्ये पत्नीसह ओरिसा येथून गांजाची खेप आणताना रंगेहाथ पकडण्यात आले होते व एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी रोशनला निलंबित करण्यात आले होते. विभागीय चौकशीही करण्यात आली. तब्बल तीन वर्षे उलटून गेल्यानंतरही रोशनवर कोणतीही कठोर कारवाई झाली नव्हती. या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस आयुक्त डॉ.रवींद्र सिंगल यांनी तातडीने कारवाई केली व त्याला नोकरीतून बडतर्फ करण्याचा आदेश जारी करण्यात आला.
तर युवराज राठोड व आदित्य यादव यांनी पुणे जिल्ह्यात निवडणूक ड्युटीसाठी पाठविण्यात आले होते. विविध पोलीस ठाण्यातील महिला व पुरुष कर्मचारी रेल्वेने पुण्याला जात होते. यावेळी दोघांनी मद्य प्राशन केले व बोगीत गोंधळ घातला. नशेत त्यांनी सहकारी महिला कर्मचाऱ्याशी आक्षेपार्ह वर्तन केले. त्यांना विरोध केला असता त्यांनी शिवीगाळ सुरू केली. इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी या कृत्याचा व्हिडिओ बनवला. पीडित महिला कर्मचाऱ्याने जीआरपीकडे विनयभंगाची तक्रार दाखल केली. हे प्रकरण तापताच दोन्ही जवानांना नागपूरला बोलावण्यात आले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त डॉ.सिंगल यांनी दोघांनाही निलंबित केले.
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…