अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील शेकापूर येथून एक खळबळजनक घटना समोर आली. शेकापूर शिवारात रेती भरण्याकरिता जात असलेला टिप्पर अनियंत्रित होऊन विद्युत खांबाला जाऊन धडकला ही धडक इतकी जोरदार होती की, काही वेळातच टिप्पर ला भीषण आग लागली या आगीत हा टिप्पर जळून खाक झाला तर विद्युत विभागाचे ही मोठे नुकसान झाले.
विद्युत विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार अनियंत्रित टिप्पर विद्युत खांबाला जाऊन धडकल्या मुळे विद्युत प्रवाह मुळे टिप्परला भीषण आग लागली आणि त्यात टिप्पर घटनास्थळवरच जळून खाक झाला. हा रिकामा टिप्पर रेती वाहतूक करिता जात असताना शेकापूर शिवारात हा अपघात घडला.
सदरचा टिप्पर विक्रम बिरबल सिंग गौतम यांच्या मालकीचा असल्याचे समजते. या अपघातात कुठलीही जिवित हानी झाली नसली तरी टिप्पर जळून खाक झाला. आणि विद्युत विभागाचे जवळपास अडीच ते तीन लाख रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती विद्युत विभागाकडून देण्यात आली. विद्युत विभागाने प्रकरणी पोलीस स्टेशन वडनेर येथे तक्रार दाखल केली असून पुढील तपास वडनेर पोलीस करीत आहे.
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…