✒️मधुकर गोंगले, अहेरी तालुका प्रतिनिधी
कमलाकर :- 16 सप्टेंबर शुक्रवारला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा छल्लेवाडा येथे राजाराम केंद्र अंतर्गत तिसऱ्या शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिक्षण परिषदेची सुरुवात विद्यार्थ्यांच्या परिपाठाने झाली यानंतर पाहुण्यांचे स्थानापन्न होऊन औपचारिक उद्घाटन संपन्न झाले.
आज ओझोन संरक्षण दिनाचे महत्त्व जाणून पाहुण्यांचे स्वागत वृक्षरोपे देऊन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजक तथा नियंत्रक सुनील आईंचवार केंद्रप्रमुख यांनी परिषदेचे महत्त्व प्रास्ताविकेतून सांगितले. त्यानंतर सरस्वती धायगुडे कैवल्य फाउंडेशनच्या फेलो ह्यांनी मोबाईलद्वारे गुगल सीट तयार करण्याची कृती आणि मार्गदर्शन केले. त्यानंतर निलेश कोडापे फुलोरा समन्वयक यांनी भाषा व गणित यांच्या कृती व विद्यार्थ्यांची गुणवत्ता याविषयी शिक्षकांशी चर्चा केली. त्यांच्या तासिकेनंतर दिगंबर दुर्गे यांनी विद्यार्थ्यांचा विकास व फुलोरा कृती सर्व शाळांनी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे व त्यामुळे आपल्या शाळेची गुणवत्ता सुधारेल याविषयी कृतिव्दारे मार्गदर्शन केले.
दुपारच्या मध्यांन्हामध्ये ओझोन संरक्षण दिनानिमित्त सर्व केंद्रातील शिक्षकांनी शाळेच्या मैदानात सामुहिक वृक्षारोपण केले. लगेच दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली. ज्ञानेश्वर कापगते विषयतज्ञ गट साधन केंद्र अहेरी यांनी विद्या प्रवेश व माता पालक गट यांच्या सभा व कृती याविषयी भविष्यासाठी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शिक्षक, पालक व पर्यवेक्षक यांची भूमिका विशद करून बालकाच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष देण्याचे सांगितले. त्यानंतर लगेच किशोर मेश्राम विषयतज्ञ गटसाधन केंद्र अहेरी यांनी एफ.एल.एन अंतर्गत निपुण भारत, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता व शिष्यवृत्ती बाबत सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना मार्गदर्शन केले.
त्यांचे तासिकेनंतर केंद्रप्रमुख सुनील आईंचवार यांनी सर्व शाळेतील शिक्षकांकडून शाळेत चालत असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती व आढावा चर्चेद्वारे घेण्यात आला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील आईंचवार केंद्रप्रमुख केंद्र राजाराम, कार्यक्रमाचे उद्घाटक हेमंत चंदू सभावत ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष छल्लेवाडा, प्रमुख अतिथी अजय पस्पुरवार उच्च श्रेणी मुख्याध्यापक राजाराम, कल्पना रविवार उच्च श्रेणी मुख्याध्यापिका छल्लेवाडा, मुख्तार शेख, मुख्याध्यापक ताटीगुडम , सरस्वती धायगुडे कैवल्य फाउंडेशनच्या फेलो, निलेश कोडापे, दिगंबर दुर्गे, ज्ञानेश्वर कापगते , किशोर मेश्राम व केंद्रातील सर्व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद व शिक्षिका उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचलन बाबुराव कोडापे यांनी केले तर सर्वांचे आभार सुरजलाल येलमुले प्राथमिक शिक्षक यांनी मानले.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…