लोखंडी भंगार नेताना वेकोली सुरक्षा रक्षकांनी पकडून केले राजुरा पोलिसांच्या स्वाधीन. राजुरा पोलिसांचा तपास सुरू
संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 27 मे:- बल्लारपूर क्षेत्रातील वेकोलीच्या धोपटाळा खुल्या कोळसा खाणीत चोरयांचे सत्र सुरू असतानाच MH 40 CT 0870 बोलेरो चारचाकी वाहणातून वेकोलीच्या धोपटाळा खुल्या कोळसा खाणीतून दोन टन लोखंडी भंगार नेताना सुरक्षा रक्षकाने पकडले व राजुरा पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपी अक्षय पहानपटे वय 26 वर्ष राहणार राजीव गांधी चौक राजुरा यांच्यावर भादवी कलम 379 अन्वये राजुरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उप निरीक्षक पांडुरंग डी. हाके, सुनील गौरकार, किशोर तुमराम, तिरुपती जाधव, योगेश पिदूरकर, महेश बोलगोडवार , रामा बिंगेवाड सह राजुरा पोलीस पुढील तपास सुरू आहे. वेकोली व्यवस्थापक यांच्या प्रवासाकरिता असलेल्या या बोलेरो गाडीतून भंगार चोरी सापडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या चोरीवरून मागील काही चोरयांचे धागे हाती लागतील का याचा तपास सुरू आहे.
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…