विठ्ठल ठोंबरे, शिर्डी / राहाता तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राहाता:- भगवान गंगाधर राशीनकर रा.धनगरवाडी,पो. वाकडी, ता. राहाता यांच्या दुचाकी मोटर सायकल गाडीला (गाडी नं MH 17 AM 1653) राहाता विरभद्र मंदिराच्या पाठीमागील बाजूस भाजीमार्केट जवळ राहाता साकुरी रोडवर पोलीसांची गाडी नं MH16 AT 6862 या फोर व्हीलर गाडीमुळे अपघात झाला आहे. हा अपघात त्या ठिकाणच्या प्रत्यक्षदर्शी लोकांच्या माहितीनुसार पोलीस विभागामध्ये कार्यरत कल्याण काळे यांच्या गाडीमुळे सदर अपघात झाला आहे. ह्या संपूर्ण घटनेचे माहिती राहाता पोलीस स्टेशनला दिली असता त्यांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ सुरु केली. व संपूर्ण झालेल्या प्रकारकडे दुर्लक्ष केले.
यावेळी अपघात झालेल्या व्यक्तीला लोणी येथील पीएमटी दवाखान्यात उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यांचे रिपोर्ट देखील लोणी पोलीस ठाणे मध्ये आहे अशी माहिती समोर आली. प्रत्यक्षदर्शी यांना राहाता पोलीस स्टेशन मध्ये माहिती देण्यासाठी घेऊन गेले असता. राहाता पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार धिरज अभंग, पोलीस निरीक्षक सोपान काकड, पोलीस कर्मचारी चौधरी या संपूर्ण अधिकारी यांनी सदर घटनेची कोणत्याही प्रकारे चौकशी केली नाही.
यावेळी झालेल्या घटनेची सविस्तर माहिती राहाता पोलीस स्टेशन दिली असता त्यांनी या घटनेवर परदा टाकण्याचे काम करत अज्ञात चालकविरुद्ध तक्रार दाखल करुन या घटनेला वेगळी दिशा देण्याचे काम केले व प्रत्यक्षदर्शी याच्या वर देखील दबाव टाकण्याचं काम यावेळी करण्यात आले. तसेच तक्रार नोंदविण्यासाठी गेलो असता त्यांनी वेगवेगळी कारणे दिली साहेब बाहेर गेले, निवडवणुकीची ड्युटी आहे, कागदपत्रे आमच्या जवळ नाही, आम्हाला कोणाचा फोन आला नाही अशी विविध प्रकाची उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे आज तब्बल दोन ते अडीच महिने होतं आले असून अजून कोणत्याही प्रकारची चौकशी करुन कार्यवाही झालेली नाही त्यामुळे राशीनकर कुटुंबात हळहळ व्यक्त केली जातं आहे. सामान्य घरातील व्यक्तीला न्याय मिळणार का? या घटनेकडे सर्वांचे लक्ष वेधलेले आहे. झालेल्या या सर्व घटनेची संपूर्ण चौकशी करुन लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या माहितीनुसार पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वामने यांच्याकडे सोपाविण्यात आला आहे.
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…