युवराज मेश्राम विदर्भ ब्युरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन मोहपा:- सम्राट अशोका बहुउद्देशीय संस्था मोहपा येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, वीर बिरसा मुंडा व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच या संयुक्त जयंती कार्यक्रम माननीय अरुणभाऊ सोमकुवर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व थोर पुरुषांच्या फोटोला पाहुण्यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, डॉ. राजीव पोद्दार, किशोर गजभिये माजी आयएस अधिकारी हे होते.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे महाराष्ट्राचे नेते डॉ. राजीवजी पोद्दार माजी आईएएस अधिकारी किशोर गजभिये मनोहरराव शेंडे यांनी महापुरुषाच्या जीवनकार्याचा आणि सामाजिक जीवनात बदल घडविण्यासाठी उत्तम असे मार्गदर्शन केले.
सम्राट अशोका बहुउद्देशीय संस्था मोहपा तर्फे सामाजिक ऋण फेडणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यात सत्कारमूर्ती माजी आयएस अधिकारी किशोर गजभिये, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष मनोहरराव कुंभारे, महाराष्ट्राचे नेते डॉ. राजीव पोद्दार, विदर्भ ब्युरो चीफ युवराज मेश्राम, अरुणभाऊ वाहने जिल्हा सचिव भारतीय बौद्ध महासभा, पंचायत समितीचे माजी सदस्य दिलीप धोटे, आंबेडकरी साहित्यिक मनोहर शेंडे, प्रदीप विग्ने गुरुजी सामाजिक कार्यकर्ते, समता सैनिक दलचे विजय कापसे, बन्सीधरजी कोठीकर ज्येष्ठ नेते, सोनाली गोंडाणे सामाजिक कार्यकर्त्या, आंबेडकरवादी नेते मनोज चिचखेडे यांना छत्रपती शिवाजी महाराज रयतेचा राजा हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
आंबेडकरी चळवळीचा वेग वाढविण्याकरिता व आंबेडकरी चळवळ तेवत ठेवण्याकरिता रात्र दिवस मेहनत करणारे नगरपरिषद मोहपयाचे माजी सदस्य भीमराव डोंगरे हे गेल्या 40 वर्षापासून सामाजिक धार्मिक राजकीय क्षेत्रात कार्य करीत आहे. त्याचप्रमाणे थोर पुरुषांच्या संयुक्त जयंती निमित्त सामाजिक क्षेत्रात उत्तुंग कार्य करणाऱ्या मान्यवरांना छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात येतो की जेणेकरून इतर व्यक्तींनी पण सामाजिक क्षेत्रात रुची दाखवून सामाजिक कार्यात हातभार लावण्याकरता ते पुढे यावेत सामाजिक कार्यात रुची वाढवण्याकरता व सत्कारमूर्ती मान्यवरांचे सामाजिक योगदानाची प्रशंसा करण्याकरता हा सत्कार दरवर्षी घेण्यात येत असतो त्याचप्रमाणे समाज प्रबोधन व्हावे याकरता संविधान मनोहरे आणि अश्विनीताई खोब्रागडे यांचा वैचारिक संगीतमय प्रबोधन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात हजारोच्या संख्येने जणू समुदायाने वैचारिक प्रबोधन श्रवण केले.
या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक भीमराव डोंगरे माजी नगरसेवक तर संयोजक माजी नगरसेवक मनीष देशमुख हे होते. या कार्यक्रमाचे संचालन मुख्य आयोजक भीमराव डोंगरे यांनी केले तर सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे कळमेश्वर तालुक्याचे सरचिटणीस शुद्धपालजी गजभिये व नागसेन कसारे यांनी केले तर आभार प्रदर्शन या कार्यक्रमाचे संयोजक मनीषजी देशमुख यांनी केले.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…