विठ्ठल ठोंबरे, शिर्डी /राहाता तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राहाता:- भगवान गंगाधर राशीनकर रा.धनगरवाडी,पो. वाकडी, ता. राहाता यांच्या टू व्हिलर गाडीला (गाडी नं महा.१६ ए.एम.१६५३) राहाता विरभद्र मंदिराच्या पाठीमागील बाजूस भाजीमार्केट जवळ राहाता साकुरी रोडवर पोलीसांची गाडी नं महा.१६ ए.टी ६८६२ या फोर व्हीलर गाडीमुळे अपघात झाला आहे.
हा अपघात त्या ठिकाणच्या प्रत्यक्षदर्शी लोकांच्या माहितीनुसार पोलीस विभागामध्ये कार्यरत कल्याण काळे यांच्या गाडीमुळे सदर अपघात झाला आहे. ह्या संपूर्ण घटनेचे माहिती राहाता पोलीस स्टेशनला दिली असता त्यांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ सुरु केली. व संपूर्ण झालेल्या प्रकारकडे दुर्लक्ष केले. अपघात झालेल्या व्यक्तीला ग्रामीण रुग्णालय लोणी उपचारासाठी नेले असता त्यांचा येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
प्रत्यक्षदर्शी यांना राहाता पोलीस स्टेशन मध्ये माहिती देण्यासाठी घेऊन गेलो असता. राहाता पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार धिरज अभंग, पोलीस निरीक्षक सोपान काकड, पोलीस कर्मचारी चौधरी,या संपूर्ण अधिकारी यांनी सदर घटनेचा कोणत्याही प्रकारे चौकशी केली नाही.तसेच या घटनेला वेगळी दिशा देत प्रत्यक्षदर्शी यांना धमाकावले, सबूत मिटविण्याचे काम देखील यांनी केले. असा आरोपी यावेळी करण्यात आला.
यासर्व घटनेची सविस्तर माहिती पोलीस अधिक्षक अहिल्यानगर यांना दिली आहे. झालेल्या या सर्व घटनेची संपूर्ण चौकशी करुन लवकरात लवकर योग्य ती कारवाही करण्यात यावी. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या माहितीनुसार प्रत्यक्षदर्शी देखील उपलब्ध असून पुढील तपास पोलीस उपअधिक्षक शिरीष वामने यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…