राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- महानगराच्या वसईच्या पेल्हार पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या धानिव बाग हरवटे पाडा येथील एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील जंगलात 28 मे मंगळवार रोजी महिलेच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केलेल्या अवस्थेत एका अनोळखी महिलेचा मृतदेह आदळून आला होता. त्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली होती. सायरा बानू असे या महिलेचे नाव आहे.
सायरा बानू या महिलेचा खुनाचा छडा लावण्यात वसई पोलिसांना मोठे यश आले आहे. मात्र याचा तपास करताना काही खळबळजनक खुलासेही पोलिसांनी केले आहे. विशेष म्हणजे ही हत्या आरोपीने केला त्याला पकडण्यासाठी पोलिसांना कंडोम बरोबरच सेक्स प्रेची मदत झाली. या आधारवर पोलिसांनी तपास करत आरोपीला थेट दिल्लीमधून बेड्या ठोकल्या आहे. पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी तपास स्वतः हाती घेऊन गुन्हयाच्या तपास केला.
काय आहे ही घटना: सायरा बानू वसईच्या धानीवबाग तलाव परिसरात पती आणि दोन मुलांबरोबर राहात होत्या. जियाउल्लाह म्हातावु शाह हे त्यांच्या पतीचे नाव आहे. तर नजाबुद्दीन मोहम्मद सम्मी हा त्यांचा भाचा आहे. नजाबुद्दीन आणि सायरा बानू हे नात्याने भाचा मामी आहेत. मात्र त्यांच्यात अनैतिक संबध होते. मात्र नजाबुद्दीने याने सहा महिन्या पुर्वी दुसऱ्या महिलेशी लग्न केले. ही बाब मामी सायरा हिला खटकत होती. त्यामुळे यादोघांमध्ये सतत वाद होत होते. शेवटी यावर शेवटचा तोडगा काढण्याचे ठरले. आपण एकत्र भेटू रोमँन्स करू असे त्याने मामीला सांगितले. त्यानंतर तिही त्याच्या बरोबर जाण्यास तयार झाली.
पेल्हार पोलीस स्टेशनच्या हद्दीत धानिव बाग हरवटे पाडा येथील जंगलात 28 मे ला हे दोघेही गेले. तिथेच तिचा त्याने चाकूने खून केला. खून झाल्याची माहिती पोलिसांनी समजली. त्यावेळी मृतदेह ओळखणे कठीण झाले होते. पण अंगावरील कपड्यावरून ती मुस्लिम असावी असा अंदाज पोलिसांनी लावला. शिवाय मृतदेहाच्या अजूबाचा परिसरही तपासून पाहीला. तिथे त्यांना वापरलेले एक कंडोम आणि सेक्ससाठी वापरला जाणारा स्प्रे सापडला. त्यानंतर त्यावली कोड वरून तो ज्या मेडिकल मधून घेतला होता त्या ठिकाणी पोलिस गेले. त्यांनी तिथे विचारणा केली. मेडीकलच्या मालकाने ज्यानेही कंडोम आणि सेक्स स्प्रे घेतला होता त्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिले.
ती महिला कोण याचा शोध पोलिस घेत होते. त्याचा शोध अखेर थांबला. शोधत शोधत ते धानीवबाग तलाव येथे राहणाऱ्या जियाउल्लाह म्हातावु शाह याच्या घरी गेले. मात्र ते घरी नव्हते. चौकशी केल्यानंतर ते पोलिस स्टेशनला गेल्याचे समजले. त्यांची पत्नी तीन दिवसा पासून बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी त्याच वेळी मृत अवस्थेतील सायरा यांचा फोटो दाखवला. त्यांचे पती जियाउल्लाह यांनी फोटो हा आपल्या पत्नीचाच असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यनंतर पोलिसांनी त्या मेडिकलमधील सीसीटीव्ही फुटेज दाखवले. त्यात असलेल्या व्यक्तीलाही त्यांनी ओळखले. तो नजाबुद्दीन असल्याचे त्यांने सांगितले. शिवाय त्याचे आणि आपल्या पत्नीचे अनैतिक संबध असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवाय तो दिल्लीत राहात असल्याची माहितीही त्याने दिली.
पोलिसांनी तातडीने नजाबुद्दीन याचा शोध घेण्यासाठी त्याच्या मोबाईल फोनचे लोकेशन ट्रेस केले. त्यावरून तो दिल्लीत असल्याचे समजले. पोलिसांनी तातडीने एक टीम दिल्लीला रवाना केली. दिल्लीत या टिमने शोध घेत आरोपी नजाबुद्दीन याला बेड्या ठोकल्या. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याची 10 जून पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…